AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झणझणीत मिसळ आणि मुळशीच्या नागरिकांचा गोडवा, सुप्रिया सुळे, नाव, वलय आणि प्रेम

सुप्रिया सुळे यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या ग्राहकांनी त्यांचं आनंदाने स्वागत केलं. एका ग्राहकाने तर थेट आपली जागाच सोडली. यावेळी सुप्रिया यांनी त्यांना आपल्या जागेवर बसण्याची विनंती केली.

झणझणीत मिसळ आणि मुळशीच्या नागरिकांचा गोडवा,  सुप्रिया सुळे, नाव, वलय आणि प्रेम
| Updated on: Apr 12, 2023 | 9:56 PM
Share

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज मुळशी (Mulshi) येथील एका प्रसिद्ध हॉटेलला भेट देत मिसळवर ताव मारला आहे. सुप्रिया सुळे यांनी या हॉटेलला भेट दिली तेव्हा तो प्रसंग त्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टीपण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवर तो क्षण लाईव्ह प्रक्षेपित करण्यात आला आहे. या व्हिडीओत सुप्रिया सुळे यांचा साधेपणा आणि त्यांनी हॉटेलला भेट दिल्यामुळे हॉटेल मालक आणि त्यांचे कुटुंबिय किती खूश झाले ते अचूकपणे दिसत आहे.

सुप्रिया सुळे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांना जी गोष्ट मनात भावते त्याविषयी त्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सविस्तरपणे लोकांसमोर मांडतात. या माध्यमातून ते काहीतरी करु पाहणाऱ्या अनेकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतात. याशिवाय सुप्रिया सुळे वेगवेगळ्या ठिकाणी भेट देतात तेव्हा त्यांनी जी गोष्ट आवडते त्याबद्दल त्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना सांगतात. यावेळी देखील सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करत बारामतीमधील एका प्रसिद्ध हॉटेलमधील मिसळची माहिती दिली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या लाईव्ह व्हिडीओत एक गोष्ट बघायला मिळाली आहे. सुप्रिया सुळे यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या ग्राहकांनी त्यांचं आनंदाने स्वागत केलं. एका ग्राहकाने तर थेट आपली जागाच सोडली. यावेळी सुप्रिया यांनी त्यांना आपल्या जागेवर बसण्याची विनंती केली. पण संबंधित व्यक्ती आदर म्हणून जागेवर बसत नाही. यावेळी सुप्रिया त्यांना आपल्यामुळे उठावं लागल्याचा भाव मनात ठेवून सॉरी म्हणतात. यावेळी हॉटेल मालकाचे कुटुंबिय आणि इतर नागरिक सुप्रिया यांच्यासोबत फोटो काढतात.

सुप्रिया सुळे यांनी दिपक हॉटेलला भेट दिल्याचे फोटोदेखील फेसबुकवर शेअर केले आहेत. “आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मुळशी तालुक्यातील पौड येथील प्रसिद्ध दिपक हॉटेलला भेट दिली. यावेळी त्यांच्या ‘नानांची मिसळ’चा आस्वाद घेतला. हॉटलचे मालक महेश पढेर, चिराग पढेर, चित्रा पढेर आणि कुटुंबियांनी मिसळचा पारंपारिक अस्सलपणा आजही टिकवून ठेवला आहे. याबद्दल पढेर आणि कुटुंबियांचे अभिनंदन करुन चविष्ट मिसळबद्दल आभार व्यक्त केले. आपण कधी पौडमध्ये आलात तर दिपक हॉटेलला नक्की भेट द्या”, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.

“याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे, अमित कंधारे, स्थानिक नागरिक यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते”, अशी देखील माहिती त्यांनी दिली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.