महाराष्ट्राचा कर्नाटकाला ठोश्यास ठोसा, आता कर्नाटकाच्या बसवर लिहिले जय महाराष्ट्र….

| Updated on: Dec 06, 2022 | 8:04 PM

कर्नाटकात ज्या प्रमाणे वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे तेथील मराठी भाषिकांवर प्रचंड अन्याय अत्याचार करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचा कर्नाटकाला ठोश्यास ठोसा, आता कर्नाटकाच्या बसवर लिहिले जय महाराष्ट्र....
Follow us on

पुणेः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद वाढल्यानंतर त्याचे पडसाद अनेक ठिकाणी दिसून आले. महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांची कर्नाटकातील कन्नडिग्गांनी तोडफोड केल्यानंतर आता त्याचे पडसाद महाराष्ट्रातही जशास तसे या प्रमाणे उमटत आहेत. त्यामुळे कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसवरही जय महाराष्ट्र लिहून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

कर्नाटकात ज्या प्रमाणे महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करण्यात आली.त्याच प्रमाणे पुण्यातील खेड-शिवापूर टोल नाक्यावरही स्वराज्यचे कन्नडिग्गांविरोधात आंदोलन करून कर्नाटकमध्ये केलेल्या उच्छादाला स्वराज्यने प्रत्युत्तर दिले असल्याचे स्वराज्यचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी करून दिले आहे.

महाराष्ट्रातील वाहनांची कर्नाटकात तोडफोड केल्यानंतर कर्नाटक सरकारच्या वाहनांचीही हवा सोडण्यात आली. कारण आज कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असणाऱ्या व एमएच पासिंग असणाऱ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्य संघटनेच्यावतीने जोरदार प्रत्युत्तर देत देण्यात आले आहे.

कर्नाटकातील वाहनांवर स्वराज्य संघटनेचे स्टिकर लावण्यात आले असून वाहनांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून कन्नडिग्गांचा निषेधही नोंदविण्यात आला आहे.

कर्नाटकात ज्या प्रमाणे वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे तेथील मराठी भाषिकांवर प्रचंड अन्याय अत्याचार करण्यात येत आहे.

तेथील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्याही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी तक्रार दाखल करुन 15 पेक्षा अधिका मराठी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्रात कर्नाटकाविरोधात निषेध नोंदवण्यात आला असला तरी कोणत्याही वाहनांची तोडफोड न करता. त्या वाहनांवर फक्त स्वराज्य आणि जय महाराष्ट्र लिहून निषेध नोंदवण्यात आला आहे. तर काही वाहनांची हवाही सोडण्यात आली आहे.