पुणे शहरात झळकले कुख्यात गुंडाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे पोस्टर

| Updated on: Mar 18, 2023 | 8:56 AM

पुणे-बेंगलोर महामार्गालगत चांदणी चौक परिसरात एका युथ फाऊंडेशनतर्फे बेकायदा पोस्टर्स लावण्यात आले. या पोस्टरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पोलिसात अनेक गुन्हे दाखल असलेल्या या व्यक्तीसंदर्भात हे पोस्टर आहेत.

पुणे शहरात झळकले कुख्यात गुंडाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे पोस्टर
Follow us on

पुणे : पुणे तेथे काय उणे असे नेहमी म्हटले जाते. नुकतेच पुणे शहरातील कसबा पेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक (Pimpri Chinchwad byelection)झाली. कसबा पेठेत टिळक परिवाराला उमेदवारी दिली नाही, यावरुन बॅनर लागले होते. आमचं ही ठरलं धडा कसा शिकवायचा…या बॅनरची चर्चा संपूर्ण निवडणूक काळात चालली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तासंघर्षावरील बॅनर पुणे शहरात लावले. त्यात चक्क सरन्यायाधीशांना उद्देशन लिहिले गेले आहे. परंतु पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये (PCMC Crime news) कुख्यात गुंडच्या वाढदिवसाचे पोस्टर लागले आहे. त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

काय आहे पोस्टर


पुणे-बेंगलोर महामार्गालगत चांदणी चौक परिसरात निलेश घायवळ युथ फाऊंडेशनतर्फे बेकायदा पोस्टर्स लावण्यात आले होते. कुख्यात गुंड निलेश घायवळ याला शुभेच्छा देणारे अनधिकृत पोस्टर्स लागले. गुंड निलेश घायवळ याला शुभेच्छा देणारे पोस्टर्स लागल्यामुळे खळबळ उडाली. यानंतर घायवळ युथ फाउंडेशनच्या सदस्यांसह दोघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

पुणे महानगरपालिका आणि पोलिसांनी हे पोस्टर काढून घेतले. परंतु चर्चा सर्व शहरभर झाली.या प्रकरानंतर हिंजवडी पोलिसांनी नीलेश घायवळ युथ फाऊंडेशनच्या तीन सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर भादंवि कलम 188 सोबत मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कोण आहे निलेश घायवळ


नीलेश घायवळ हा पिंपरी-चिंचवडमधील कुख्यात गुंड आहे. पुणे शहर पोलिसांनी गॅंगस्टर निलेश घायवळला मोक्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याच्यावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्याचा वाढदिवसनिमित्त अति उत्साही कार्यकर्त्यांनी असे बॅनर्स लावले. त्यात अनेकांचे शुभेच्छूक म्हणून फोटो देखील टाकले गेले आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीत वाढ झाली असताना गुन्हेगारांचे होत असलेल्या उद्दातीकरणामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

शुक्रवारचा दिवस पुणे शहरात बॅनरबाजीसाठी झाला. या दिवशी लावलेले बॅनर चर्चेचे ठरले.

पुणे शहरात सत्तासंघर्षावर बॅनरबाजी, पोस्टरमध्ये थेट सरन्यायाधीशांना उद्देशून लिहिले…वाचा सविस्तर