AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसबा पेठनंतर पुणे काँग्रेसचे मिशन लोकसभा, उमेदवारही ठरला ?

पुणे हा कधीकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा गड होता. शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे नेतृत्व पुणेकरांनी मान्य केले होते. परंतु मोदी लाटेत परिस्थिती बदलली.

कसबा पेठनंतर पुणे काँग्रेसचे मिशन लोकसभा, उमेदवारही ठरला ?
Image Credit source: Google
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 05, 2023 | 9:22 AM
Share

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला. त्यानंतर पक्षाला वेध लागले लोकसभा निवडणुकीचे. कसबा पेठ प्रमाणे कधीकाळी काँग्रेसचा गड असणारा पुणे लोकसभा मतदार संघ पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसने मोर्चाबांधणी सुरु केलीय. खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या वर्चस्वाखालील असलेला लोकसभा मतदार संघात आता काँग्रेसचा गुलाल उधळण्याची तयारी सुरु झाली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमधून एक नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनीच मागणी लावून धरली आहे.

भारतीय जनता पक्षासाठी महत्वाच्या असणाऱ्या कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजय झाले. भाजपसाठी हा मोठा धक्का होता. भाजप हा काँग्रेसचा विजय नव्हे तर रवींद्र धंगेकर यांचा विजय असल्याचे सांगत आहे. दुसरीकडे धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवल्यानंतर काँग्रेससह मविआ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. कार्यकर्त्यांमधील हा जोश कायम ठेवण्यासाठी वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी काँग्रेसने सुरु केली आहे. यामुळेच पुणे लोकसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांना उमेदवार दिल्यास जागा जिंकता येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. लोकसभेसाठी त्यांचे नाव निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुणे काँग्रेसचा गड

पुणे हा कधीकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा गड होता. शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे नेतृत्व पुणेकरांनी मान्य केले होते. २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. महापालिका आणि विधानसभेतही या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांच्यांशिवाय पानही हालत नव्हते. मात्र नरेंद्र मोदी लाटेत परिस्थिती बदलली. आता पुन्हा रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी दिल्यास तेच दिवस येतील, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे.

पुण्यात १९८० पासून सतत तीन वेळा काँग्रेसचे विठ्ठल नरहर गाडगीळ लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर भाजपचे अण्णा जोशी यांच्यानंतर काँग्रेसकडे ही जागा आली. काँग्रेसचे सुरेश कलमाडी १९९६ मध्ये निवडून आले. ते केंद्रात मंत्रीही झाले. ते ही तीन वेळा पुण्यातून खासदार होते. यामुळे रवींद्र धंगकर यांच्या माध्यमातून पुन्हा हा मतदार संघ काँग्रेसला मिळवता येईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.

कोण आहेत धंगेकर?

  •  आधी 10 वर्षे कट्टर शिवसैनिक त्यानंतर मनसैनिक आणि नंतर काँग्रेस असा त्रिकोणी प्रवास करणारे पण सामान्यांचे नेते अशी ओळख रवींद्र धंगेकर यांची आहे.
  •  रवींद्र धंगेकर हे मागील 25 वर्षांपासून कसबा पेठेतील नगरसेवक आहेत. त्यामुळे लोकांमध्ये त्यांचा कायम वावर असतो. हाक दिली तेव्हा मदतीला धावून जाणारे नेते, अशी त्यांची ख्याती आहे.
  • धंगेकर यांनी पाच वेळ नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली. त्यापैकी दोन वेळा शिवसेना तर दोन वेळा मनसेचं प्रतिनिधित्व केलं.
  •  2009 मध्ये धंगेकर यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापट यांच्याविरोधात अल्प फरकाने हार पत्करली होती. अवघ्या ७ मतांनी त्यांचा पराभव झाैला. त्यावेळी ते मनसेत होते. राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू होते.
  •  2014 मध्येही रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या लाटेपुढे धंगेकर यांचा टिकाव लागला नाही. मात्र निवडणुकीत त्यांनी कडवी झुंज दिली.
  •  शहरातील भाजपची स्थिती पाहता, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला होता, मात्र भाजपमधूनच विरोध झाला आणि धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला.
  •  2017 मध्ये धंगेकर यांनी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
  •  2019 मध्ये त्यांना विधानसभेचं तिकिट मिळण्याची आशा होती. मात्र काँग्रेसने अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली होती. इथे भाजपच्या मुक्ता टिळक यांचा विजय झाला.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...