AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धांगडधिंगा भोवला! कुख्यात गुंड गजा मारणेला पोलिसांकडून अटक

मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी तळोजा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर त्याची पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली होती.

धांगडधिंगा भोवला! कुख्यात गुंड गजा मारणेला पोलिसांकडून अटक
sagar joshi
sagar joshi | Updated on: Feb 16, 2021 | 9:04 PM
Share

पुणे : हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन मारणेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी तळोजा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर त्याची पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. अगदी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जवळपास तीनशे ते पाचशे चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक निघाली. यावेळी मारणेचे साथीदार द्रुतगती महामार्गावर थांबून आरडाओरडा करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते. या धांगडधिंगा प्रकरणात पोलिसांनी गजा मारणेला अटक केली आहे.(Pune police arrest goon Gajanan Marne)

गृहराज्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

पुण्यातील दोन हत्या प्रकरणातून मुक्तता झाल्यानंतर कुख्यात गुंड गजा मारणेची तळोजा येथील कारागृहातून सुटका झाली होती. यावेळी मारणेने 300 गाड्यांच्या ताफ्यासह मिरवणूक काढली. या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार असल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. तुरुंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढणे हा प्रकार पूर्णपणे चुकीचा असल्याचं देसाई म्हणाले.

गजानन मारणे सोमवारी कारागृहाबाहेर

कुख्यात गुंड गजा मारणे सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून बाहेर आला. त्यावेळी कारागृहाबाहेर मोठ्या संख्येने त्याचे समर्थक जमले होते. गजा मारणे याच्या सुटकेनंतर त्याच्या पिलावळीने एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच केले. पिंपरी – चिंचवडच्या हद्दीतून सायंकाळी पुण्याच्या दिशेने मारणे आणि त्याच्या समर्थकांचा ताफा गेला.

नेमकं काय घडलं?

कुख्यात गुंड गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले.(Pune police arrest goon Gajanan Marne)

पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार

शंभुराज देसाई यांनी गजा मारणे मिरवणूक प्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. मिरवणुकीच्या व्हिडीओ क्लिप तपासल्या जाणार आहेत. बेकायदेशीर पद्धतीनं जमाव जमवला असेल तर चौकशीअंती त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. जेलमधून सुटून आल्यानंतर गजा मारणेवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

2014 पासून तुरुंगात

गुंड गजा मारणे याच्यावर 2014 मधील दोन हत्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणी मारणे आणि समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी त्याला येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

कुख्यात गुंड गजानन मारणेविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल

VIDEO | गुंड गजानन मारणेच्या साथीदारांचा एक्स्प्रेस वेवर हलकल्लोळ, पोलिसांनी ड्रोन जप्त करताच पळापळ

Pune police arrest goon Gajanan Marne

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...