AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune River | पुणे शहरातील ही नदी गंगा नदीपेक्षा जुनी, काय आहे या नदीचे महत्व

pune river mula and mutha | पुणे शहरातील ही नदी गंगा नदी पेक्षाही जुनी आहे. या नदीला पुणे शहराची जीवनरेषा म्हटली जाते. परंतु आता या नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुणे शहरात ही नदी आली कशी? यासंदर्भात एक कथा आहे.

Pune River | पुणे शहरातील ही नदी गंगा नदीपेक्षा जुनी, काय आहे या नदीचे महत्व
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 08, 2023 | 3:19 PM
Share

पुणे | 8 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातील जीवन रेषा असलेली नदी कोणती? हा प्रश्न विचारल्यावर पुणेकरांकडून सेंकदाचा वेळ न लागता उत्तर येईल. पुणे शहरातील मुळा-मुठा नदी ही सर्वात जुनी आहे. अगदी गंगा नदीपेक्षाही जुनी ही नदी आहे. या नदीला ऐतिहासिक महत्व आहे. परंतु आता प्रदूषणामुळे या नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मुठा नदी पुण्यापासून पश्चिमेला सुमारे ३५ किलोमीटर लांब प्रवास करत पुणे शहरात दाखल होते. त्यात खडकवासला धरणाच्या अलीकडे आंबी आणि मोशी या मुठा नदीच्या उपनद्यांचा संगम होतो. त्यानंतर हा प्रवाह पुढे मुठे नदीला मिळतो. या जागेला मुळा-मुठा संगम म्हणतात. या ठिकाणी संगमेश्वराचे मंदिर आहे.

काय आहे या नदीचा इतिहास

पुणे येथील इतिहासकार डॉ. पी.के. घाणेकर यांनी मुळा, मुठा नदीसंदर्भात पौराणिक कथा सांगितली. त्यानुसार, जुन्या काळात राजा गजनक होते. त्यांनी सह्याद्री पर्वतावर कठोर तपस्या केली. त्यांच्या तपस्येमुळे इंद्र देवाला धोका वाटू लागला. इंद्र देवाने त्यांची तपस्या भंग करण्यासाठी दोन अप्सरांना पाठवले. त्या राजाची तपस्या भंग करु लागल्या. तेव्हा राजा गजनक यांनी त्यांना शाप दिला. त्या शापामुळे त्या अप्सरा मुळा, मुठा नद्या बनल्या. पुढे भीमा नदीत मिळाल्यावर या नद्यांना मुक्ती मिळाली.

सह्याद्री पर्वता इतक्या जुन्या आहेत या नद्या

मुळा, मुळा नद्या या सह्याद्री पर्वता इतक्या जुन्या आहेत. म्हणजेच हिमालय आणि गंगा नदीपेक्षाही जुन्या आहेत. या नदीवर पानशेत आणि खडकवासला धरण बांधले गेले आहे. या दोन्ही नद्या पुणे शहराच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत आहे. मुळा सह्याद्री पर्वतावरुन पुणे उत्तर-पश्चिम दिशेकडे येते. या नदीच्या मार्गात पौड, नंदे ही गावे येतात. पुणे शहरात प्रवेश करण्यापूर्वी हिंजेवाडी, बालेवाडी, पिंपरी-चिंचवडमधून ही नदी पुणे शहराच्या पश्चिमेकडे येते.

पुणे शहराचे वैभव आणि जीवन रेषा म्हणून मुळा, मुठा नदी ओळखली जाते. परंतु प्रदूषण आणि अतिक्रणामुळे त्याचे अस्तित्व धोक्यात  आले आहे. यामुळे पर्यावरणप्रेमीच नाही तर प्रत्येक पुणेकरांना चिंता वाटू लागली आहे.

Follow Us
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर