AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : काढून टाका ते, संभाजी भिडेंनी सेना आमदाराला मास्क काढायला लावला

संभाजी भिडे यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तोंडावर लावलेला मास्क काढायला लावला. (Sambhaji Bhide Anil Babar corona mask)

VIDEO : काढून टाका ते, संभाजी भिडेंनी सेना आमदाराला मास्क काढायला लावला
संभाजी भिडे यांनी अनिल बाबर यांना मास्क काढण्याची सूचना केली
| Updated on: Feb 25, 2021 | 2:02 PM
Share

सांगली: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन झालं आहे. सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तोंडावर लावलेला मास्क त्यांनी काढायला लावला. यावेळी इतर कार्यकर्ते देखील विना मास्क आढळून आले.( Shivpratishthan chief Sambhaji Bhide violate corona rules in Sangli Programme)

खानापूर तालुक्यात घडला प्रकार

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे.शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या भूमिपूजन करण्यात येत होते. अनिल बाबर भूमिपूजन करत असताना भिडे यांनी त्यांना टोपी दिली. यानंतर बाबर यांना त्यांनी मास्क काढण्याची सूचना केली. आमदार बाबर यांनी संभाजी भिडेंच्या सूचनेप्रमाणं मास्क काढून ठेवला आणि भूमिपूजन केले.

भिडे गुरुजींचे सहकारी देखील विना मास्कच

राज्यात सध्या कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण वाढत आहे. आळसंद येथील भूमिपूजन कार्यक्रमाला संभाजी भिडे आणि त्यांचे सहकारी विना मास्क जमलेले पाहायला मिळाले. सांगली जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.

करवीर तालुक्यातील वडणगे येथील बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली

संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानतर्फे रायगडावर सुवर्ण सिंहासन आणि खडा पहारा या विषयांवर एक बैठक होणार होती. करवीर तालुक्यातील वडणगे या गावात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मागील काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठानमध्ये फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व होते. मात्र, सध्या राज्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोना संसर्ग गावपातळीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शिवप्रतिष्ठानच्या या बैठकीला प्रशासनातर्फे परवानगी नाकारण्यात आली होती.

20 वर्षांपासून शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक म्हणून काम पाहणारे नितीन चौगुले यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर शिवप्रतिष्ठान संघटनेतील कलह समोर आला. 5 फेब्रुवारी रोजी शिवप्रतिष्ठानकडून राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून नितीन चौगुले यांना निलंबत करत काढून टाकण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. नितीन चौगुले यांनी सांगलीत मेळावा घेत नवी संघटना स्थापन करत काम करण्याची घोषणा केली.

संबंधित बातम्या:

शिवप्रतिष्ठान मधील वाद वाढणार की मिटणार? नितीन चौगुले समर्थक धारकाऱ्यांपुढं भूमिका मांडणार

(Sambhaji Bhide violate corona rules in Sangli Programme)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.