पुण्यात एकाच दिवशी दोन विविध ठिकाणी गोळीबार, नागरिकांमध्ये दहशत…

पुण्यातील खडक पोलीस स्थानकाच्या हद्दीत एकाच दिवसात दोन ठिकाणी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यात एकाच दिवशी दोन विविध ठिकाणी गोळीबार, नागरिकांमध्ये दहशत...
| Updated on: Jul 24, 2026 | 10:16 PM

विद्येचे माहेर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील पेठ पोलीस चौकी आणि  खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनुक्रमे सकाळी आणि सायंकाळी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर काही वेळापूर्वी तिघा अल्पवयीन मुलांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. लागोपाठ घडलेल्या दोन्ही घटनांनी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

पुण्यातील घोरपडे पेठ पोलीस चौकीसमोरच फायरिंग झाल्याची घटना घडली आहे. सकाळी साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास भरदिवसा घडलेल्या या फायरिंगच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. या घटनेत मोटर सायकलीवरुन आलेल्या दोघांनी दोन राऊंड फायर केल्याचे म्हटले जात आहे.या घटनेत एक जण जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेत पोलिसांची फोरेन्सिक व्हॅन घटना स्थळी दाखल झाली असून या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुजल सुनील परदेशी आणि यश चंदन परदेशी दोघा जणांची नुरु शेख याच्याशी दोन वर्षांपूर्वी भांडणे झाली होती. सुजल सुनील परदेशी आणि यश चंदन परदेशी हे दोघे दुचाकीवरुन घोरपडी पेठ परिसरात आले होते. त्यांनी नूर शेख याच्यावर ३ गोळ्या झाल्याचे म्हटले जात आहे. नूर शेख हा गंभीर जखमी झाल्याने त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

सायंकाळी हवेत फायरिंग

स्वारगेट येथून लोहिया नगरकडे येणाऱ्या रस्त्याने तिघे जण गल्ली क्रमांक तीन मधून बाईकवरुन येत असताना त्यांनी हवेत फायरींग केल्याची घटना सायंकाळी घडली आहे. त्यांनी गल्ली क्रमांक नऊमधून जाताने पुन्हा हवेत फायरींग केल्याचे म्हटले जात आहे. हे आरोपी अल्पवयीन असून त्यांनी दहशत पसरवण्यासाठी ही हवेतील फायरिंग केल्याचे उघडकीस आले. खडक पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या पथकाने या ठिकाणीच्या घटनास्थळचा पंचनामा पूर्ण केलेला आहे. आणि आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us