AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार

Pune Water Cut : पुणेकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. गुरूवारी शहरातील काही भागातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Pune: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार
Pune Water Cut
| Updated on: Nov 17, 2025 | 9:49 PM
Share

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गुरूवारी शहरातील काही भागातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी कमी दाबाने आणि उशिरा पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच मंगळवारी आणि बुधवारी योग्य प्रमाणात पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. गुरूवारी कोणत्या कारणामुळे आणि कोणत्या भागातील पाणी पुरवठा बंद असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

‘या’ जलकेंद्र परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार

पालिकेच्या पाणिपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र, जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती टाकी परिसर, पर्वती टाकी परिसर व पर्वती टाकी परिसर, पर्वती टैंकर पॉईट, बडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीवगांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत टाकी परिसर, शिवणे इंडस्ट्रीज परिसर, एम.एन.डी.टी. एच.एल.आर, एस.एन.डी.टी. एम. एल. आर टाकी परिसर, चतुश्रुंगी टाकी परिसर, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. 1 व 2, गणपती माथा, जुने वारजे जलकेंद्र व नव्याने समाविष्ट गावे बुस्टर पंपिंग अंतर्गत येणाऱ्या परिसरातील विद्युत पंपींग विषयक व वितरण विषयक देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या जलकेंद्राअंतर्गत येणाऱ्या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत 3000 MM व्यासाची रों वॉटर पाईप लाईन टाकण्यात आलेली आहे. आता खडकवासला धरणातून दोन 1400 MM व्यासाच्या पाईप लाईन 3000 MM व्यासाच्या पाईप लाईनला जोडण्यात आल्या आहेत. तसेच आता या 300 MM व्यासाच्या लाईनवर फ्लो मीटर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच 1400 MM लाईनवरील बटरफ्लाय वॉल्व्ह बसवला जाणार आहे. त्यामुळे 1400 मीमी व्यासाचे स्लुईस वॉल्व्ह पूर्ण बंद होत आहेत. त्यामुळे गुरुवारी धरणातून होणारा पाणीपुरवठा सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

या कारणामुळे शहरातील विविध भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच गुरूवारी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

Follow Us
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा