पाऊस LIVE : मुंबईसह उपनगरात पावसाचा वेग मंदावला

पावसाने जून संपत आला तरी राज्यात म्हणावी तशी सुरुवात केली नाही. मात्र जूनच्या अखेरीत पाऊस जोर धरू लागला आहे. राज्यभरातील पावसाचे अपडेट -

पाऊस LIVE : मुंबईसह उपनगरात पावसाचा वेग मंदावला
Follow us
| Updated on: Jun 28, 2019 | 10:25 PM

मुंबई  :  पावसाने जून संपत आला तरी राज्यात म्हणावी तशी सुरुवात केली नाही. मात्र जूनच्या अखेरीत पाऊस जोर धरू लागला आहे. मुंबईसह कोकणात हळूहळू पाऊस जोर धरत आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे रेल्वे वाहतूक तर विस्कळीत झालीच, शिवाय रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम पाहायला मिळाला.

LIVE UPDATE

[svt-event title=”पहिल्याच पावसात राज्यात 9 बळी” date=”28/06/2019,10:23PM” class=”svt-cd-green” ] पहिल्याच पावसात राज्यात पावसामुळे 9 बळी गेले असून मुंबईत 3 बळी गेले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्यामुळे एक्स्प्रेस गाड्या रद्द ” date=”28/06/2019,10:21PM” class=”svt-cd-green” ] रद्द करण्यात आलेल्या गाड्या : प्रगती एक्स्प्रेस (मुंबई-पुणे), सिंहगड एक्स्प्रेस (मुंबई-पुणे), पुणे-पनवेल पॅसेंजर, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, भुसावळ-पुणे एक्स्प्रेस व्हाया दौंड-मनमाड [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यातही जोरदार पाऊस” date=”28/06/2019,10:16PM” class=”svt-cd-green” ] ठाण्यामध्ये आतापर्यंत एकूण 500 मिमी पावसाची नोंद झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम” date=”28/06/2019,10:15PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी भरल्याने वाहतुकी कोंडी झाली आहे. लोकल ट्रेनही 1 तास उशिरा धावत असून हार्बर रेल्वेवरील लोकल 45 मिनिटे उशिराने धावत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”सिंहगड एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस दोन दिवस रद्द” date=”28/06/2019,5:56PM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील पावसाचा रेल्वेला फटका, पावसामुळे पुणे- मुंबई तीन रेल्वे रद्द तर एक वळवली, पावसामुळे उद्या आणि परवा (29 आणि 30 तारखेला) सिंहगड एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस रद्द पुणे- मुंबई आणि मुंबई-पुणे या दोन्ही ट्रेन दोन दिवस रद्द. त्याचबरोबर पुणे पनवेल ही पॅसेंजर ही रद्द करण्यात आली. भुसावळ- पुणे ही एक्सप्रेस डायव्हर्ट करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस लोणावळा कर्जत कल्याण या मर्गाने न जाता दौंड मनमाड मार्गे जाईल [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत पावसाचा वेग मंदावला” date=”28/06/2019,5:33PM” class=”svt-cd-green” ] मुंबई उपनगरातील पावासाचा वेग मंदावला, रेल्वे वाहतूक सुरळीत [/svt-event]

[svt-event title=”तीनही मार्गावरील लोकल उशिरा” date=”28/06/2019,5:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” उघड्या गटारात आई-लेक पडले” date=”28/06/2019,4:37PM” class=”svt-cd-green” ] भिवंडी – ठाणे रोडवरील राहनाळ येथे होलीमेरी शाळेच्या समोरील उघड्या गटारात पावसाचे पाणी साचल्याने विद्यार्थिनी आणि तिची आई पडली,सुदैवाने नागरिकांनी दोघींनाही बाहेर काढल्याने अनर्थ टळला [/svt-event]

[svt-event title=”दादरमध्ये भिंत कोसळली” date=”28/06/2019,4:33PM” class=”svt-cd-green” ] दादरमधील सेनापती बापट मार्गावर कामगार मैदानाजवळ भिंत कोसळली, तीन जण जखमी, जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”दक्षिण मुंबईत पावसाचा जोर ओसरला” date=”28/06/2019,4:18PM” class=”svt-cd-green” ] लोअर परळ, लालबाग परिसरात पावसाचा जोर ओसरला, तुंबलेलं पाणी ओसरण्यास सुरुवात [/svt-event]

[svt-event title=”अंधेरीजवळ वाहतूक कोंडी” date=”28/06/2019,3:25PM” class=”svt-cd-green” ] अंधेरी उड्डाणपूल द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, वाहतूक अत्यंत धीम्या गतीने [/svt-event]

[svt-event title=”दिवेघाटात जोरदार पाऊस” date=”28/06/2019,1:51PM” class=”svt-cd-green” ] वारी – दिवेघाटात जोरदार पावसाला सुरुवात, पाऊस सुरू झाल्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, भर पावसात नाचत- गात वारीचा आनंद [/svt-event]

[svt-event title=”हिंदमाता परिसरात पाणी तुंब” date=”28/06/2019,1:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई – टिळकनगरात पाणी तुंबलं” date=”28/06/2019,12:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ठाणे स्टेशन परिसरात पाणी भरलं” date=”28/06/2019,11:17AM” class=”svt-cd-green” ] ठाणे स्टेशनजवळ पाणी भरण्यास सुरुवात, सतत पाऊस पडत असल्याने, ट्रॅकच्या मध्ये पाणी साचलं [/svt-event]

मुंबई येत्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरीत पावसाचं धुमशान

रत्नागिरीत पावसाचे धुमशान पाहायला मिळालं. जोरदार पावसामुळे नदी-नाले वाहू लागले. अचानक पाणी वाढल्याने नदीपात्रात पार्क केलेली वाहने अडकून पडली. राजपुरातील कोदावली नदीपात्रात काल संध्याकाळी दोन गाड्या अडकल्या. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने गाड्या अडकल्या. अखेर नागरिकांच्या प्रयत्नामुळे अडकलेल्या गाड्या काढण्यात यश आलं.

सिंधुदुर्ग- अखेर सावडाव धबधबा प्रवाहित झाला आहे. आज सकाळपासून पावसाची उसंत पाहायला मिळत आहे. मात्र काल रात्रभर पाऊस संततधार कोसळत होता. या पावसाने सर्वांच्या प्रतीक्षेत असलेला कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा सकाळपासून प्रवाहित झाला आहे. आंबोली नंतर सावडाव धबधबा पर्यटकांची पसंती आहे.

गुहागर – गुहागर,चिपळूण,खेड परिसरात रात्रभर पाऊस कोसळला. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणारा शेतकरी आंनदात पाहायला मिळाला. पावसामुळे अखेर नद्या- नाल्यांना पाणी आले. कोकणातील या भागातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पाऊस आहे.यामुळे आता शेतीकामांना वेग येणार आहे.

मुंबईत पावसाची हजेरी

मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईच्या लालबाग, परळ, दादर, माहीम भागात सकाळपासून पावसाने बरसायला सुरुवात केली. वसई-विरारपासून चर्चगेटपर्यंत पाऊस बरसत आहे.

कल्याण : काल संध्याकाळपासून कल्याणमध्ये पाऊस सुरु आहे. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.  कल्याणच्या चिकलघर परिसरात पाणी साचले. त्यामुळे नालेसफाईची पहिल्याच पावसात पोलखोल झाली.

शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे लाईट गेली. काल सायंकाळी 6 वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे. महत्वाचं म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

वसई : वसई- विरारमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. काल रात्रीपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाने आज सकाळपासून दमदार हजेरी लावली. त्यामुळे कामावर जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागला आहे.  पावसामुळे वातावरण देखील अत्यंत आल्हाददायक बनलं असून, हवेमध्ये मोठ्या प्रमाणात गारवा जाणवत आहे.

भिवंडी भिवंडी शहरासोबत ग्रामीण भागात काल रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाची रिपरिप सकाळपर्यंत कायम आहे.

मुरबाड:

पहिल्याच पावसात मुरबाडमध्ये पाणी तुंबले आहे. गटारी तुंबल्याने दुकानांमध्ये पाणी घुसल्याचं पाहायला मिळालं. तर मुरबाड-शहापूर रस्त्याचे काम चालू असल्यामुळे आणि त्याला पर्यायी रस्ता नसल्यामुळे मुरबाड-शहापूर रस्ता बंद झाला आहे. वशिंदच्या बाजूने मुरबाडला जाण्यासाठी एक रस्ता होता, मात्र रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने पहिल्याच पावसात तोही बंद झाला.

बुलडाणा

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस आला. संग्रामपूर, बुलडाणा, शेगांवसह इतर ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

कराड

एकीकडे पाऊस होत असताना, साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचा अतिसौम्य धक्का जाणवला. कोयनानगर परिसरात रात्री 9.वाजून 36 मिनीटांनी 2.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा अतिसौम्य धक्का जाणवला. या भूकंपाचं केंद्रबिंदू कोयना धरणापासून 9.6 किलोमीटर अंतरावर कोडोली गावच्या नैऋत्य दिशेला 3 किलोमीटर अंतरावर जमिनीत खोली 7.0 कि. मी होती. कोयना धरण व्यवस्थापनाने याबाबतची माहिती दिली.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.