घटकाभरच्या पावसाने अंधेरी सबवे तुंबला, पालिकेची पोलखोल, मान्सूनपूर्व पावसाने मुंबईकरांना उकाड्यातून दिलासा

मॉन्सून उद्या केरळमध्ये दाखल होणार आहे. मात्र, आजच मुंबईतील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. ढग दाटून आली आहेत. त्यामध्येच अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाला सुरूवात झाली. हवामान विभागाने आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

घटकाभरच्या पावसाने अंधेरी सबवे तुंबला, पालिकेची पोलखोल, मान्सूनपूर्व पावसाने मुंबईकरांना उकाड्यातून दिलासा
Mumbai Rain
| Updated on: Jun 03, 2026 | 9:53 AM

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. उपनगरातील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरात आज सकाळपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मे हीटमुळे मुंबईकर सध्या घामाघूम झाले होते. मात्र, आज सकाळी दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव भागात अचानक ढग दाटून आले आणि हलक्या सरी कोसळू लागल्या.  अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेपासून नागरिकांना आराम मिळाला आहे. मुंबईच्या जवळपास सर्वच भागात पावसाला सुरूवात झाली. दादर, खुर्ला, प्रभादेवी, लालबाग या परिसरात ढगाळ वातावरण अजून हलका पाऊसही कोसळत आहे.

कुर्ल्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. कुर्लात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. केरळमध्ये आज मॉन्सून दाखल होईल. मात्र, मॉन्सून देशात दाखल होण्यापूर्वीच राज्यात पावसाला सुरूवात झाली. अनेक भागात मोठ्या प्रमाणाच ढग दाटून आलीत. भारतीय हवामान विभागाने आज पावसाचा अलर्ट जारी केला होता. पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

मागच्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये मोठी उष्णता होती. आता मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. एकाच पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जवळपास ठिकाणी ढगाळ वातावरण असून पाऊस वाढण्याची शक्यता आहे. फक्त मुंबईच नाही तर राज्यातील अनेक भागात आज भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

अंधेरी सब-वेवच्या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेनं उड्डाणपुल उभारण्याचा विचार केला होता. मात्र सल्लागाराच्या अहवालात उड्डाणपूलाचा पर्याय नापास ठरला. अंधेरी पूर्व-पश्चिमला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला अंधेरी सब-वे पण पावसाळा आला की हमखास किमान 20 ते 35 वेळा तुंबतो. मोगरा नाला या समस्येचं मूळ आहे. उगमस्थानापासून अंधेरी सब-वेपर्यंत सुमारे अडीच किलोमीटर अंतरात नाल्याला तब्बल 13 मीटरचा उतार आहे. त्यामुळे पावसाचं पाणी वेगानं सब-वे परिसरात येतं.

अंधेरी भुयारी मार्गासह दाऊद बाग आणि आझादनगर परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण होते. मात्र, यावर्षी मान्सून पूर्व पावसात अवघ्या काही वेळाचा पाऊस पडल्यानंतरही अंधेरी सबवे तुंबल्यानं मुंबईकरांची चिंता वाढलीय. मॉन्सून केरळमध्ये दाखल होत असला तरीही आजच मुंबईत दाखल झाल्यासारखे वाटत आहे. तसे वातावरण सर्वत्र आहे.

पालघरमध्येही पहाटेच पावसाला सुरूवात झाली. पहाटे ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाच्या सरींमुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पालघरच्या ग्रामीण भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काही वेळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.

Follow Us