राज्यात ‘हिवसाळा’, अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस!

मुंबई: ऐन हिवाळ्यात राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह पंढरपुरात जोरदार पाऊस पडत कोसळला. रत्नागिरीत- सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. आकाशात काळे ढग जमल्याने पाऊस कोसळण्याची चिन्हं आहेत. अनेक भागात पावसाने शिडकाव केला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. कारण अद्याप  कापलेले भात अजूनही […]

राज्यात 'हिवसाळा', अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई: ऐन हिवाळ्यात राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह पंढरपुरात जोरदार पाऊस पडत कोसळला.

रत्नागिरीत- सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. आकाशात काळे ढग जमल्याने पाऊस कोसळण्याची चिन्हं आहेत. अनेक भागात पावसाने शिडकाव केला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. कारण अद्याप  कापलेले भात अजूनही शेतात आहे. त्यामुळे नुकसानीची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात पाऊस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही भागात पहाटे, तर काही भागात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली.

लातूर-  लातूरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. दिवसभराच्या उकाड्यानंतर वातावरणात गारठा पसरला. पावसामुळे लातूर शहराचा विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला. औसा, बेलकुंड, किल्लारी, रेनापूर, निठूर परिसरात पावसाच्या सरी बरसल्या.

सांगली –  सांगली जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळला. काही भागात रात्रभर तर काही भागात पहाटे पावसाचं आगमन झालं. विटा, खानापूर, कडेगाव, पलूस, आटपाडी परिसरात अवकाळी पाऊस पडला.

कोल्हापूर: शहरासह इचलकरंजीत पहाटेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.  सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे  शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.