Raj Thackeray Live : राज ठाकरेंची सभा रेकॉर्डब्रेक होणार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसे सैनिक मुंबईत

कोरोनामुळे राज ठाकरे (Raj Thackeray Live) यांच्या वादळी सभेला गेली दोन वर्षे मनसेचे कार्यकर्ते मुकले आहेत. त्यामुळे यंदाची सभा रेकॉर्डब्रेक होणार अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी दिली आहे.

Raj Thackeray Live : राज ठाकरेंची सभा रेकॉर्डब्रेक होणार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसे सैनिक मुंबईत
राज ठाकरेंची वादळी सभा
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 02, 2022 | 6:49 PM

मुंबई : गुढी पाडव्याच्या मनसेच्या सभेची (Mns Gudipadwa melva) मनसे सैनिक अशी काही वाट बघतात की जशी वारकरी वारीची. कोरोनामुळे राज ठाकरे (Raj Thackeray Live) यांच्या वादळी सभेला गेली दोन वर्षे मनसे सैनिक मुकले आहेत. त्यामुळे यंदाची सभा रेकॉर्डब्रेक होणार अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी दिली आहे. तसेच आम्हाला गर्दीची चिंता नाही. हा गुढीपाडवा उत्साहाचा आणि जल्लोषाचा आहे. कारण करोनाचे सगळे निर्बंध उठले आहेत. दोन वर्षानंतर मनसैनिकांना भेटणार आहोत, असेही त्या म्हणाल्या आहेत. या सभेसाठी राज्यभरातून कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत. या सभेसाठी भव्य असा स्टेज सजला आहे. शिवतिर्थावरील संपूर्ण वातावरण भगवं होऊन बसलंय. हे आधीच वातावरण बघूनच अनेकांना सभा कशी होणार याचा अंदाज येऊ लागलाय.

राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी वसई विरार मधून शेकडो मनसे सैनिक दादरच्या दिशेने रवाना झाले आहे. विरार मनवेलपाडा, कारगील नगर, चंदनसार, नालासोपारा पूर्व-पश्चिम, वसई वालीव, गोखीवरे या परिसरातून मनसे कार्यकर्ते दादरमध्ये येत आहेत. काहीजण बस तर काहीजण लोकलने प्रवास करत पोहोचत आहेत. राज ठाकरे यांच्या सभेसाठी उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबई येथे सभेसाठी दाखल होत आहेत. घोटी टोल नाका येथे नवं वर्षाची गुढी नाशिकचे मनसेचे माजी महापौर अशोक मुतडक यांच्या हस्ते उभारण्यात आली . यावेळी मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या साठी भोजनाची व्यवस्था ही करण्यात आली होती.

सभेआधी जोरदार शक्तीप्रदर्शन

या सभेआधी मनसेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी भव्य अशी रॅली काढली होती. शिवतिर्थावर आता मनसेच्या सभेला चागलीच गर्दी जमली आहे. या वदळी सभेची मनसैनिकांना प्रतीक्षा लागली आहे. कोरोनाने गेल्या दोन वर्षात अनेक राजकीय, धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे राज ठाकरेंची अशी तुफान गर्दीची सभाही झाली नव्हती. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मनसैनिकांना या सभेची प्रतीक्षा लागली होती. आज अखेर तो क्षण आला आहे. आज राज ठाकरेंचं तुफानी भाषण मनसैनिकांना ऐकायला मिळणार आहे.

Raj Thackeray LIVE : मनसेची भव्य बाईक रॅली सुरू, थोडच्याच वेळात राज ठाकरेंची तोफ धडाडणार

CM Uddhav Thackeray on Cyber Crime: सायबर क्राईमचा व्हायरस रोखण्यासाठी यंत्रणा उभारणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Mumbai Metro 2A, metro 7 : मुख्यमंत्र्यांनी दाखवला मेट्रोला हिरवा झेंडा, पहिलं तिकीट काढून प्रवासही केला