Chagan Bhujbal : राज, राणे आणि राणा म्हणजे RRR चित्रपट, छगन भुजबळ यांची पॉलिटिकल राड्यावर खोचक प्रतिक्रिया

| Updated on: May 03, 2022 | 4:54 PM

मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज, राणे आणि राणा म्हणजे RRR चित्रपट (RRR Movie) , असल्याची खोचक प्रतिक्रिया दिली आहे. केद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यानंतर आता नवनीत राणा आणि रवी राणा हेही अटकेत आहेत. आणि आता राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Chagan Bhujbal : राज, राणे आणि राणा म्हणजे RRR चित्रपट, छगन भुजबळ यांची पॉलिटिकल राड्यावर खोचक प्रतिक्रिया
छगन भुजबळ यांची पॉलिटिकल राड्यावर खोचक प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अटकेच्या शक्यतेने जोर धरला आहे. कारण रविवारी झालेल्या सभेत तब्बल बारा अटी मोडल्याप्रकरणी पोलिसांनी (Aurangabad Police) राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर राज्यभरात पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजवण्यास सुरूवात केली आहे. त्यावर आता जारदार राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज, राणे आणि राणा म्हणजे RRR चित्रपट (RRR Movie) , असल्याची खोचक प्रतिक्रिया दिली आहे. केद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यानंतर आता नवनीत राणा आणि रवी राणा हेही अटकेत आहेत. आणि आता राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्याही अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांनी ट्रिपल आरची उपमा दिली आहे.

भुजबळ नेमकं काय म्हणाले?

तसेच पोलिसांनी नियमा प्रमाणे नोटीस दिल्या होत्या. पोलिसांनी भाषण तपासलंय. त्यातून त्यांनी अतिशय अग्रेसिव्ह आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस कायद्या प्रमाणे काम करत आहेत. याचा शेवटी न्याय पालिका विचार करणार आहे, हे सगळं रुटीन आहे. नोटीस येणार याबाबत त्यांची देखील मानसिक तयारी आहे, असेही भुजबळ म्हणाले. तसेच केंद्रीय मंत्री राणे यांना देखील अटक झाली. त्यानंतर राणा याना देखील अटक झाली. कोर्टाने देखील।राणा दाम्पत्याला फटकारलं. कायदे बनवणारे असे कस करू शकतात अस न्यायालयाने देखील म्हटलं आहे. राज, राणे आणि राणा म्हणजे RRR चित्रपट आहे, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर असे भाषण करताना कारवाई होणार याची तयारी असतेच आणि आंदोलन करण्यावर ठाम असाल तर पोलीस आपलं काम करतील, असा इशाराही त्यांनी दिली आहे.

राज्यभर मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा

राज्यभर पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावायला सुरूवात केली आहे. मनसे कार्यकर्त्यांना नोटीस द्यायला सुरुवात झाल्यानंतर पुण्यातील अनेक मनसेचे नेते नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. तर चार दिवसाच्या देवदर्शनासाठी वसंत मोरे बालाजीला रवाना झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. तर काही ठिकाणच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी औरंगाबादेतून दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. त्यावरही काही मनसे कार्यकर्ते ठाम आहेत.

हे सुद्धा वाचा