Raj Thackeray: पुढच्या ४ ते ५ महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल; राज ठाकरेंच्या दाव्याने एकच खळबळ

Raj Thackeray News: राज ठाकरेंनी देशाच्या भविष्यावर भाष्य केले आहे. मुंबई प्रेस क्लबमधील कार्यक्रमानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Raj Thackeray: पुढच्या ४ ते ५ महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल; राज ठाकरेंच्या दाव्याने एकच खळबळ
| Updated on: Oct 21, 2026 | 6:40 PM

आज मुंबईत छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन करण्यात आले. मुंबई प्रेस क्लबमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. राज ठाकरेंच्या हस्ते डान्स ऑफ डेमोक्रेसी छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन करण्यात आले आहे. यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मोठं विधानं केली आहे. तसेच देशातील भविष्यातील परिस्थितीवर महत्त्वाचं भाष्य केले आहे.

माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कालचे दोन्ही दसरा मेळावे पाहिले नाही. आताच्या परिस्थितीवर बोललं गेलं पाहिजे. बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात अशी मागणी मी करत आलो आहे. २०१८ पासून ही मागणी मी करत आहे. तेव्हापासून मी असं का बोलतोय हे आता अनेकांना समजत आहे. ही मागणी मी सुरूवातीपासूनच करत आलो आहे. पुढारलेल्या सर्व देशांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जात आहेत. जगात बॅलेट पेपर मग भारतात मशीन कशाला? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Loading...

ते म्हणाले की, देशातील निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत. पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका नेपाळमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. अख्ख्या जगाने इव्हीएम नाकारलं आहे, मग भारतात इव्हीएस का? फ्रान्समध्ये एका व्यक्तीच्या सांगण्यावरून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात आली. पुढच्या ४ ते ५ महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होणार हे निश्चित आहे. देश रस्त्यावर आला तरी मला आश्चर्य वाटणार नाही.

राज ठाकरेंनी सांगितलं की, एक काळ असा येईल की देशाला पंतप्रधान नसेल. मुलांनी काहीच केलं नव्हतं. तुम्ही हंगामा केला आहात. शांततेत आंदोलन होतं. दिल्ली पोलिसांनी मारहाण केली आहे. पोलिसांनी विद्यार्था आंदोलकांना मारहाण केली आहे. देशात लोकशाही कुठे राहिली आहे? अनेक गोष्टी उघड होतील पण त्या सरकारला झेपणार नाहीत. खरी लोकशाही अमेरिकेत आहे, आपल्याकडे नाही. अमेरिकेत कोणत्याही प्रकारचे फतवे निघत नाहीत.

ते पुढे म्हणाले की, अदानींवरची डॉक्युमेंट्री काढायला लावली जात आहे. भाजपला स्पॉन्सर करणारे चित्रपटच का पाहायचे? आपण काय प्रकारचे निर्णय देतो हे कोर्टानेही पाहायला हवे. २०१४ मध्ये मोदींमुळे सत्ता आली, आरएसएसमुळे नाही. हत्येच्या आरोपीला सोडलं पण सीजेपीच्या दोघांना अटक केली आहे. लोकांनी मतदान केलं तरी आपण निवडणूक जिंकणार नाही अशी चौकट आखली आहे. प्रत्येकाचा राग व्यक्त होणार आहे. यामुळे पुढे परिस्थिती चिघळत जाणार आहे.

राज ठाकरे म्हणाले की, सुरक्षेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. त्या आरोपी बिश्नोईला जेलमधून बाहेर काढून फटकवलं पाहिजे. खुप गोष्टी बाहेर येणार आहेत. आता थांबणार नाही. येणाऱ्या काळात सरकार चुका करत राहणार आहे. नीट आंदोलनावेळी विद्यार्थ्यांचा राग दिसला आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us