आधी पतीला जबर मारहाण, नंतर नऊ महिन्यांच्या गर्भवतीवर बलात्कार
नागपूर : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं होमग्राऊंड नागपुरातील गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाही. आता नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बलात्काराआधी नराधमाने महिलेच्या पतीलाही जबर मारहाण केली. माणुसकीला काळिमा फासणारी घटना नागपुरातील भेंड ले-आऊटमध्ये घडली. 20 वर्षीय गर्भवती महिलेवर शेजारीच राहणाऱ्या नराधमाने बलात्कार केला. छोटू उर्फ मद्रासी […]
नागपूर : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं होमग्राऊंड नागपुरातील गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाही. आता नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बलात्काराआधी नराधमाने महिलेच्या पतीलाही जबर मारहाण केली.
माणुसकीला काळिमा फासणारी घटना नागपुरातील भेंड ले-आऊटमध्ये घडली. 20 वर्षीय गर्भवती महिलेवर शेजारीच राहणाऱ्या नराधमाने बलात्कार केला. छोटू उर्फ मद्रासी मेश्राम असे या नराधमाचे नाव आहे.
धक्कादायक म्हणजे, या विकृत कृत्याला शेजारीच राहणाऱ्या मीराबाई नामक महिलेने नराधमाला मदत केली. या मीराबाईच्या घरीच पीडित गर्भवती महिलेवर नराधमाने बलात्कार केला.
पोटावर लाथ मारण्याची धमकी देत बलात्कार केला गेल्याची माहित समोर आली आहे. यावेळी पीडित गर्भवती महिलेच्या पतीलाही जबर मारहाण करण्यात आली.
दरम्यान, नराधम मद्रासी मेश्राम याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत, मीराबाई या महिलेच्या झोपडीवर हल्लाही केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे सध्या शांतता आहे.