मोठी बातमी! अखेर महायुतीमध्ये बंड, भाजपच्या अडचणी वाढणार, घडामोडींना वेग

मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरल्यानंतर आता महायुतीमध्ये मोठ्या बंडाची शक्यता निर्माण झाली आहे.

मोठी बातमी! अखेर महायुतीमध्ये बंड, भाजपच्या अडचणी वाढणार, घडामोडींना वेग
Mahayuti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 6:21 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. अखेर विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे. जागा वाटपच्या फॉर्म्यूल्यानुसार पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची जागा ही भाजपच्या वाट्याला आली आहे. तर नागपूरची जागा देखील भाजपलाच मिळाली आहे. अमरावती मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला असून, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. दरम्यान पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेनेकडून दावा करण्यात आला होता, मात्र ही जागा आता भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे शिवसेनेच्या इच्छूकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेच्या वतीने मंगेश चिवटे हे इच्छूक होते. मात्र आता ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे मंगेश चिवटे यांचा पत्ता कट झाला आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगेश चिवटे जरी ही जागा भाजपच्या वाट्याला गेली असली तरी या मतदारसंघातून ते मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी मंगेश चिवटे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याची माहिती देखील सूत्रांकडून समोर येत आहे. दरम्यान एकीकडे मंगेश चिवटे हे पुणे शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीमध्ये आहेत

Loading...

तर दुसरीकडे  मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्गीय व त्यांचे माजी ओएसडी सचिन सानप देखील पुणे शिक्षक मतदार संघतून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. पक्षाने नाही दिलं तर अपक्ष म्हणून शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवणार असं सचिन सानप यांनी म्हटलं आहे. सानप हे पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये  राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.  दरम्यान सानप हे आता या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यामुळे भाजपच्या अडचणी वाढू शकतात. पुणे पदवीधर आणि शिक्षक हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेले असून, या मतदारसंघातून प्रत्येकी पाच संभाव्य उमेदवारांचे नाव भाजपकडून पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे आता नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us