Rekha Jare हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय, बाळ बोठेविरोधात स्टँडिंग वॉरंट जारी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळ बोठे याच्याविरोधात स्टँडिंग वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

Rekha Jare हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय, बाळ बोठेविरोधात स्टँडिंग वॉरंट जारी
Rekha Jare Murder Case
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 7:13 PM

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील (Rekha Jare murder case) मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे (Bal Bothe) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळ बोठे याच्याविरोधात स्टँडिंग वॉरंट (Standing warrant) जारी करण्यात आलं आहे. यामुळे आता त्याला कोणत्याही राज्यात पकडणं शक्य होणार आहे. यामुळे आता सर्व राज्यातील पोलीस यंत्रणांनाही अलर्ट देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. (Rekha Jare murder case Standing warrant issued against Bal Bothe Ahmadnagar Police)

मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेल्या स्टँडिंग वॉरंट अर्जावर आज निर्णय दिला आहे. या वॉरंटमुळे बाळ बोठेला राज्यात आणि अन्य राज्यात पकडणे शक्य होणार आहे. गेल्या काही दिवसांआधीच पोलिसांनी स्टँडिंग वॉरंटसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज महत्त्वाचा निर्णय देण्यात आला आहे.

रेखा जरे यांच्या हत्येला महिना उलटूनही आरोपी बाळ बोठेला अटक नाहीच

रेखा जरे यांच्या हत्येला महिना उलटुनही आरोपी बाळ बोठेला अद्याप अटक झालेली नाही. त्याविरोधात अहमदनगरमध्ये तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी या विरोधात अहमदनगर शहरात कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेला लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही करण्यात आली. नगरमधील विविध स्वयंसेवी संघटनांनी हा कँडल मार्च काढला होता.

बाळ बोठेचा पाय आणखीच खोलात, आता विनयभंग, खंडणीचा गुन्हा दाखल

रेखा जरे हत्याकांडमधील फरार आरोपी बाळ बोठेचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. सुपारी, हत्या आणि विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आता त्याच्यावर खंडणीचाही गुन्हा दाखल झाला आहे. नोकरी घालवण्याची भीती घालून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप एका महिलेने केला असून नगरच्या तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये बोठेवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला.

बाळ बोठेला मदत करणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात

रेखा जरे हत्याप्रकरणाच्या तपासात पोलिसांना एक मोठं यश मिळालंय. पोलिसांनी या प्रकरणातील फरार आरोपी बाळ बोठे याला मदत करणाऱ्या संशयिताला 27 डिसेंबरला पुण्यातून ताब्यात घेतलं. या संशयिताकडून बाळ बोठेच्या ठावठिकाण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशयिताचे नाव निलेश शेळके असे आहे. निलेश शेळके हा डॉक्टर असून तो गेल्या अडीच वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर नगरमधील बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय, पत्नीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. पोलीस सध्या बाळ बोठे याचा कसून शोध घेत आहेत. याच कारवाईदरम्यान पोलिसांनी शुक्रवारी पुण्यातून निलेश शेळके याला ताब्यात घेतले. पोलिसांचे पथक बाळ बोठेला पकडण्यासाठी गेले होते. तेव्हा निलेश शेळके पोलिसांच्या हाती लागला.

नेमकं प्रकरण काय?

रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या असल्यामुळे रेखा जरे हत्या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत दोन दुचाकीस्वारांनी जरे मायलेकाशी वाद घातला आणि रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली

अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हा प्रकार घडला होता. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

अहमदनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत 3 दिवसांमध्ये सर्व आरोपींना अटक केली आहे. तसेच मुख्य सूत्रधाराचाही शोध घेतला आहे. सुरुवातीला ‘रोड रेज’मधून झालेल्या वादातून रेखा जरे यांची हत्या झाल्याचं भासवण्यात आलं होतं. परंतु आरोपींनी सुपारी घेतल्याची कबुली दिल्याने हत्येचा कट उघड झाला. (Rekha Jare murder case Standing warrant issued against Bal Bothe Ahmadnagar Police)

संबंधित बातम्या :

Bal Bothe | बाळ बोठेचा पाय आणखीच खोलात, आता खंडणीचा गुन्हा दाखल

बाळ बोठेचा लॉक्ड मोबाईल करणार हत्याकांडाचं प्रकरण अनलॉक?

बोठेच्या जामीनावरील सुनावणीत ‘हनीट्रॅप’चा उल्लेख, बोठे गजाआड की बाहेर? निर्णयाकडे लक्ष

(Rekha Jare murder case Standing warrant issued against Bal Bothe Ahmadnagar Police)

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.