AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्ज फेडण्यासाठी उद्योगपती अनिल अंबानी मुख्यालय विकणार

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती अनिल अंबानी 18 हजार कोटींच्या कर्जाखाली बुडाले आहेत. तत्काळ सर्व कर्ज फेडणे शक्य नसल्याचे सांगत अंबानी यांनी येत्या वर्षभरात 50% कर्जाचा बोजा कमी करण्याची ग्वाही प्रसारमाध्यमांना दिली होती.

कर्ज फेडण्यासाठी उद्योगपती अनिल अंबानी मुख्यालय विकणार
| Updated on: Jul 01, 2019 | 9:15 PM
Share

मुंबई: रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती अनिल अंबानी 18 हजार कोटींच्या कर्जाखाली बुडाले आहेत. तत्काळ सर्व कर्ज फेडणे शक्य नसल्याचे सांगत अंबानी यांनी येत्या वर्षभरात 50% कर्जाचा बोजा कमी करण्याची ग्वाही प्रसारमाध्यमांना दिली होती. त्यानुसार सांताक्रूझ येथील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे 7 लाख चौरस फुटाचे मुख्यालय विकून किंवा दीर्घ मुदतीवर भाडेतत्त्वावर देऊन करोडो रुपये उभे करण्याची प्रक्रिया अंबानी यांनी सुरू केली आहे.

सांताक्रूझ येथील मुख्यालय विकण्यासाठी अंबानी यांनी ब्लँकस्टोन आणि अन्य एका अमेरिकन कंपनीशी चर्चाही केल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यालय विकल्यानंतर अंबानी त्यांच्या दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट या कार्यालयातून रिलायन्सचा कारभार पाहणार आहेत. तेथूनच रिलायन्सची सर्व सुत्रे हलतील.

मात्र, सांताक्रुझ येथील जागा विकणे अनिल अंबानींसाठी सोपे नाही. तेथेही त्यांच्या समोरील अडचणींचा डोंगर मोठा आहे. अंबानी जे मुख्यालय विक्री करण्याचा विचार करत आहे, त्या मुख्यालयाच्या जागेवरून ‘अपीलेट ट्रिब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटी’मध्ये वाद सुरू आहे.

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी याबाबत ट्विट करत म्हटले आहे, “अनिल अंबनी आपले सांताक्रुज येथील मुख्यालय विकत आहेत. मात्र, ते हे मुख्यालय विकू शकत नाही. अनिल अंबानी यांनी ही जमीन बेकायदेशीरपणे बळकावली आहे. त्यामुळे त्यांना ही जागा विकू देण्याची परवानगी द्यायला नको. याबाबत एक याचिकाही दाखल आहे. ही जागा ‘बॉम्बे सबअर्बन इलेक्ट्रिक सप्लाय’ (BSES) या कंपनीचे होते. ही कंपनी सुरु नाही, म्हणून ही जागा कोणी कसा बळकावू शकतो.”

‘मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन’ने संबंधित जागा अंबानी यांना विकता येणार नसल्याचा दावा दाखल केला आहे. यासंदर्भातील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी दिल्लीला होणार आहे. त्यामुळे विवादित जागा विकत घेण्यास कोणी पुढे येणार का? आणि अंबानी यांच्यावरील कर्जाचा डोंगर कमी होणार का? हे सुनावणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Follow Us
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.