VIDEO | नवाब मलिक हाय हाय, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

विधीमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकरित्या लावून धरली आहे. मात्र कालपर्यंत मलिक यांच्याकडून राजीनामा घेणार नाही, या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस तथा महाविकास आघाडी सरकार ठाम होती. आजच्या अधिवेशनात हा मुद्दा गाजणार असं दिसतंय.

VIDEO | नवाब मलिक हाय हाय, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 11:06 AM

मुंबईः महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन (Budget Session) आजपासून सुरु होत आहे. मुंबईत पार पडणाऱ्या या अधिवेशनात विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप नेत्यांनी नवाब मलिक हाय हाय… दाऊदच्या दलालांचा राजीनामा घ्या, अशी घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आशीष शेलार, अतुल भातखळकर आदी नेते उपस्थित होते. भाजप नेत्यांच्या या आंदोलनात काही वेळानंतर देवेंद्र फडणवीसदेखील (Devendra Fadanvis) सहभागी झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी यावेळी केली.

BJP Agitation

दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदशी संबंधित व्यक्तींकडून जमीनी विकत घेण्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. त्यामुळे हा सर्वात मोठा देशद्रोह असल्याची टीका भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. यावरून नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

BJP Agitation

विधीमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकरित्या लावून धरली आहे. मात्र कालपर्यंत मलिक यांच्याकडून राजीनामा घेणार नाही, या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस तथा महाविकास आघाडी सरकार ठाम होती. आजच्या अधिवेशनात हा मुद्दा गाजणार असं दिसतंय.

इतर बातम्या-

राष्ट्रवादीने ‘वेळ’ साधली, भाजपला मोठा हादरा, माजी राज्यमंत्र्यांच्या हाती घड्याळ

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी किरीट सोमय्यांची दिल्लीवारी, घोटाळ्यांच्या आरोपांचा पाठपुरावा करणार

वादळ नव्हे, आदळआपट ! सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवरती जोरदार टीका

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.