रावेर मतदारसंघात खडसे कुटुंबाला धूळ चारणार, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा ठराव

जळगाव : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांची युती झाली असली तरी विविध मतदारसंघांमध्ये नवे वाद उद्भवण्याची शक्यता आहे. याची सुरुवात रावेर लोकसभा मतदारसंघातून झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी 2014 ला युती तोडली, असा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युतीच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा ठराव मंजूर केलाय. या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव …

रावेर मतदारसंघात खडसे कुटुंबाला धूळ चारणार, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा ठराव

जळगाव : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांची युती झाली असली तरी विविध मतदारसंघांमध्ये नवे वाद उद्भवण्याची शक्यता आहे. याची सुरुवात रावेर लोकसभा मतदारसंघातून झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी 2014 ला युती तोडली, असा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युतीच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा ठराव मंजूर केलाय. या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देण्यात येणार आहे.

भुसावळ येथे आयोजित बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या बाबत चर्चा करत असताना सर्वांच्या वतीने भाजपावर रोष व्यक्त करण्यात आला. रावेर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात यावा, असाही ठराव यावेळी करण्यात आला. युती झाल्यापासून ही जागा भाजपला सुटलेली आहे. त्यामुळे या मतदार संघातील शिवसेनेची वाढ खुंटली आहे. शिवाय भाजपच्या खासदार रक्षा खडसे या आतापर्यंत शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता निधी खर्च करतात. त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून रावेर लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेसाठी सोडण्यात यावी, अशीही मागणी होत आहे. तसेच युती झालीच आणि भाजपला जागा सोडल्यास आणि खडसे कुटुंबीयांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय.

वाचारावेर लोकसभा : रक्षा खडसेंना यावेळीही ‘नो चॅलेंज’

खडसेंनी त्यांच्या जाहीर सभेत अनेक वेळा शिवसेना संपवण्याची भाषा केली असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय. नुकत्याच मुक्ताईनगर येथील सहा शिवसैनिकांवर 307 सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले, असा आरोपदेखील बैठकीत करण्यात आला. त्यामुळे रावेर लोकसभा निवडणुकीत खडसे किंवा खडसे कुटुंबीयांना युतीतर्फे उमेदवारी दिल्यास शिवसैनिक युतीचे काम करणार नाही, असे ठाम मत अनेक पदाधिकाऱ्यांनी मांडले. त्यामुळे या निर्णयाचा काय निकाल लागेल आणि भाजपला याचा फटका बसू शकतो का या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

व्हिडीओ पाहा :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *