
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारातमीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा अपघात झाला. सुरूवातीला सांगितले की, खराब हवामानामुळे विमानाचा अपघात झाला. मात्र, त्यानंतर गंभीर आरोप करण्यात आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार निघाले होते. चार प्रचारसभा त्यांच्या बारामतीत होत्या. दादा येणार म्हणून कार्यकर्ते सकाळपासूनच बारामती विमानतळावर स्वागतासाठी उभे होते. मात्र, यावेळी त्यांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. राज्यावर दु:खाचे डोंगर कोसळला. अजित पवार आपल्यात नाहीत, यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर DGCA चा धक्कादायक ऑडिट रिपोर्ट आल्याने खलबळ उडाली. सर्वांनाच मोठा धक्का बसला.
DGCA ने विमान कंपनी VSR वर कारवाई केली. यासोबतच लिअरजेटच्या 45 विमानांमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत, तात्काळ VSR कंपनीचे उड्डाण थांबवण्याचा निर्णय DGCA ने घेतला. म्हणजेच अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या विमानात काही त्रुटी होत्या?. यानंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
रोहित पवार यांनी अहवालाचा फोटो शेअर करत म्हटले की, VSR कंपनी कुठलेही compliances फॉलो करत नाही. अत्यंत मनमानी पद्धतीने असुरक्षितपणे विमाने उडवत असल्याचा मुद्दा आम्ही वारंवार मांडत आहोत आणि आज DGCA ने त्याच नॉन compliance च्या मुद्द्यावर VSR ची चार विमाने ग्राउंड केली आहेत. आपल्या लढ्याला यश येत असले तरी हे केवळ नखाएवढे आहे, अजून बरेच काही समोर यायच बाकी आहे. या विषयावर सविस्तर बोलेल… असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
VSR कंपनी कुठलेही compliances फॉलो करत नाही, अत्यंत मनमानी पद्धतीने असुरक्षितपणे विमाने उडवत असल्याचा मुद्दा आम्ही वारंवार मांडत आहोत आणि आज DGCA ने त्याच नॉन compliance च्या मुद्द्यावर VSR ची चार विमाने ग्राउंड केली आहेत. आपल्या लढ्याला यश येत असले तरी हे केवळ नखाएवढे आहे, अजून… pic.twitter.com/cQMnYdbCir
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 24, 2026
गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार VSR कंपनीवर गंभीर आरोप करताना दिसले. त्यामध्येच आता हा ऑडिट रिपोर्ट पुढे आला असून विमानात त्रुटी असल्याचे अहवालात स्पष्ट म्हणण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानंतर संशय व्यक्त केली जात असतानाच हा अहवाल आला. अजित पवार यांच्या विमान अपघाताची काही व्हिडीओ देखील पुढे आलीत.