'तिळगूळ घ्या आणि भाजपशी गोडगोड बोला', संघाचा मकरसंक्रांती उत्सव

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘तिळगूळ घ्या आणि भाजपशी गोडगोड बोला’ असं नियोजन केल्याचं दिसतंय. कारण, यंदा पहिल्यांदाच संघाच्या शाखांऐवजी वस्त्यांमध्ये मकरसंक्रांत उत्सव साजरा केला जाणार आहे. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आलीय आणि निवडणुकीत संघ भाजपला नेहमी मदत करत आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे हात मजबूत करण्यासाठी, मकरसंक्रांत उत्सवाच्या निमित्ताने संघ …

'तिळगूळ घ्या आणि भाजपशी गोडगोड बोला', संघाचा मकरसंक्रांती उत्सव

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘तिळगूळ घ्या आणि भाजपशी गोडगोड बोला’ असं नियोजन केल्याचं दिसतंय. कारण, यंदा पहिल्यांदाच संघाच्या शाखांऐवजी वस्त्यांमध्ये मकरसंक्रांत उत्सव साजरा केला जाणार आहे. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आलीय आणि निवडणुकीत संघ भाजपला नेहमी मदत करत आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे हात मजबूत करण्यासाठी, मकरसंक्रांत उत्सवाच्या निमित्ताने संघ मतदारांशी संवादाचा धागा जोडण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आता रंगू लागलीय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन आणि मकरसंक्रांत हे उत्सव दरवर्षी साजरे करतो. मकर संक्रांती उत्सव हा आतापर्यंत संघाच्या शाखांमध्ये व्हायचा. शाखेतच तिळगूळ वाटण्यात येतो. पण यावेळी पहिल्यांदाच संघ स्वयंसेवक लोकांच्या घरी जाणार आहे. स्वयंसेवक शाखांऐवजी वस्त्यांमध्ये जाऊन हा मकरसंक्रांती उत्सव साजरा केला जाईल.

तिळगूळ घ्या आणि आगामी निवडणुकीत भाजपशी गोड गोड बोला, हाच संघाच्या या मकरसंक्रांती उत्सव बदलामागे उद्देश असल्याचं बोललं जातंय. संघाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून प्रत्येत घरात संघाचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. संघाचे नागपूर महानगर संघचालक डॉ. राजेश लोया यांनीही ही बाब मान्य केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपुरात 275 वस्त्यांवर आपलं लक्ष केंद्रीत केलंय. शहरातील 275 वस्त्यांमध्ये मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा करण्याची यंदा संघाची योजना आहे. महाराष्ट्रातील इतर काही शहरातही अशाच प्रकारच्या मकरसंक्रांती उत्सवाचं संघाचं नियोजन आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही संघाने भाजपला भरभरुन मदत केली. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघ पुन्हा एकदा भाजपच्या मदतीसाठी सक्रिय झालाय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *