सुषमा अंधारेंच्या पाळीव कुत्र्याला पण ते आपल्या गटात घेतील, रुपाली ठोंबरेंचा घणाघात…

चित्रा वाघ, दीपाली सय्यद यांनी आता थंड घ्यावं. ज्या वेळी यांची सत्ता नव्हती, त्यावेळी या शांत आणि संयमाने भूमिका मांडायच्या आता सत्ता आल्यानंतर मात्र बदल झाला आहे.

सुषमा अंधारेंच्या पाळीव कुत्र्याला पण ते आपल्या गटात घेतील, रुपाली ठोंबरेंचा घणाघात...
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 9:07 PM

अहमदनगरः भाजपच्या चित्रा वाघ, उद्धव ठाकरे गटाच्या आणि शिंदे गटात गेलेल्या दीपाली सय्यद यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांची घणाघात केला आहे. चित्रा वाघ आणि दीपाली सय्यद यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी सुषमा अंधारे यांचे विभक्त पती त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरूनही त्यांनी शिंदे गटावर टीका केली. यावेळी त्या म्हणाल्या की, सुषमा अंधारे यांच्या घरात पाळीव कुत्रा असेल तर त्यालाही शिंदे गट पक्षात घेईल अशी जोरदार टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

दीपाली सय्यद यांच्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, दीपाली सय्यद यांचं ना घर काना घाट का असं झालं आहे. त्यामुळे शिंदे गटात जाण्याचा जो केविलवाना प्रयत्न आहे. आणि ही त्यांच्या कर्माची फळं असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

भाजप प्रत्येक वेळी जादूटोणा, धर्म यावर भाष्य करत असतात त्यामुळे मी ही म्हणेल की दीपाली सय्यद यांच्या ही पापाची फळे आहेत. असं म्हणत त्यांनी दीपाली सय्यद यांच्यावर निशाणा साधला.

दोन दिवसापूर्वी पत्रकारांवर रागवल्या प्रकरणी ही रुपाली पाटील-ठोंबरे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. त्या प्रकरणावरुन त्यांनी पत्रकारांची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.

भाजप पक्ष विरोधात असताना चित्रा वाघ आपली भूमिका योग्य आणि चांगल्या पद्धतीने मांडत होत्या. मात्र सत्तेत आल्यानंतर तुम्ही तुमची भूमिका बदलणार असाल तर चौथ्या स्तंभाला प्रश्न विचारण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांना विचारलेला प्रश्न हा कायद्याला सोडून विचारला नव्हता, तर तो प्रश्न तुम्हाला वर्मी लागला कारण तुमच्या भूमिकाच खोट्या असतात अशी टीका चित्रा वाघ यांच्यावर केली आहे.

यावेळी त्या म्हणाल्या की, खरा प्रश्न विचारला असेल म्हणून त्यांची शुगर वाढली असेल आणि त्याचा त्रास करून घेऊ नका असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.

सुषमा अंधारे यांच्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, त्यांच्याकडे जर पाळीव कुत्रा असेल तर तेही बघितलं पाहिजे. कारण तेही शिंदे गटात घेतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

यावेळी त्या म्हणाल्या की, व्यक्तिगत आयुष्य राजकारणात आणू नये पण सुषमा अंधारे शिंदे गटाला धारेवर धरत असल्यानेच त्यांच्या विभक्त पतीला त्यांनी पक्षप्रवेश दिला असल्याचे म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.