मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणी सचिन वाझेने पहिल्यांदाच भूमिका मांडली; NIA कोर्टात अर्ज दाखल करत नेमकं काय म्हटलं?

Sachin Waze Statement Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. सचिन वाझेने NIA कोर्टात अर्ज करून आपली भूमिका मांडली आहे.

मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणी सचिन वाझेने पहिल्यांदाच भूमिका मांडली; NIA कोर्टात अर्ज दाखल करत नेमकं काय म्हटलं?
| Updated on: Sep 29, 2026 | 9:08 PM

दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. दिशा सालियन प्रकरणावरून सचिन वाझेने एनआयए कोर्टाकडे अर्ज दाखल केला आहे. दिशा सालियन प्रकरणात सचिन वाझेची पहिल्यांदाच भूमिका समोर आली आहे. सचिन वाझेने कोर्टाकडे स्वलिखित दिलेल्या अर्जात दिशाच्या प्रकरणात त्याचे नाव जाणीवपूर्वक घेऊन बदनामीची मोहीम राबवली जात असल्याचा दावा केला आहे. यामुळे आता राजकारणात खळबळ उडाली आहे.

सतीश सालियन यांचे वकील आणि काही माध्यम जाणीवपूर्वक ही बदनामीची मोहीम चालवत असल्याचा सचिन वाझेने लिहिलेल्या अर्जात उल्लेख करण्यात आला आहे. निलेश ओझा यांना याआधी वाझेच्या लोकांनी त्यांना संपर्क केला होता. त्यांच्याकडे वाझेचा दिशाच्या प्रकरणात कबुली जबाब आहे. यातील पुरावे त्याने नष्ट केले आहेत. तसेच तो माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याचा दावा केला होता, असं पत्रात म्हटलं आहे.

Loading...

मी निलेश ओझा नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. कुठलीही माणसे त्याच्याकडे पाठवली नाहीत, असा स्पष्ट उल्लेख सचिन वाझेच्या अर्जात करण्यात आला आहे. हा दावा पूर्णपणे खोटा असून माझ्याबद्दल होत असलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. मी या प्रकरणात कुठलाही कबूलीजबाब देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे वाझेच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच सीबीआयने या प्रकरणात जर माझे प्रोडक्शन वॉरंट मागितले तर माझे म्हणजे ऐकून घेतले जावे. नंतर निर्णय घ्यावा, असे वाझेने कोर्टाला अर्जाद्वारे कळवले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘एंटिलिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही सापडल्याच्या आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाने मंगळवारी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायाधीश चकोर एस. बाविस्कर यांनी सांगितले की, बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्या (UAPA) अंतर्गत वाझे यांच्याविरुद्ध दहशतवादाचा प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध करण्यात अभियोजन पक्ष अपयशी ठरला आहे. एंटिलियाच्या रहिवाशांना दहशत दाखवण्यात आली होती, हे दर्शवणारा कोणताही ठोस पुरावा रेकॉर्डवर नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us