SRPF Recruitment: तरुणांसाठी सुवर्णसंधी! छत्रपती संभाजीनगरमध्ये SRPF ची भरती, इतक्या पदासाठी 75 हजार उमेदवार मैदानात
SRPF Recruitment: राज्यातील तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यांना झटपट नोकरी मिळू शकते. छत्रपती संभाजीनगरमध्ये SRPF ची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेतील उमेदवारांसाठी कॅम्पमध्येच राहण्याची आणि जेवण्याची निशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

SRPF Recruitment: राज्यातील तरुणांचे संरक्षण सेवेतील नोकरीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्यांच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यांची मेहनत आणि अभ्यास आता उपयोगी ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची कॅम्पमध्येच करण्यात आली राहण्याची व जेवण्याची निशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. SRPF च्या 291 जागेच्या भरतीसाठी 75 हजार उमेदवारी मैदानात असतील. याविषयीची माहिती छत्रपती संभाजीनगरचे कमांडंट एसआरपीएफ गट क्रमांक 14 चे विक्रम साळी यांनी दिली.
SRPF च्या 291 जागेसाठी भरती प्रक्रिया
SRPF च्या 291 जागेच्या भरतीसाठी 75 हजार उमेदवारी मैदानात आहेत. या जागा वरणगाव फॅक्टरीसाठी जे नवीन गट तयार करण्यात येत आहे. त्यासाठी होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यासाठी तयारी आणि प्रक्रिया सुरू झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उमेदवारांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी खास काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना उन्हाळ्याचा त्रास होणार नाही.
SRPF गट क्रमांक 20 साठी भरती प्रक्रिया
जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील एसआरपीएफ चा नवीन गट आहे गट क्रमांक 20 साठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. येत्या 16 मार्चपासून 291 पदासाठीसाठी जवळपास 75 हजार अर्ज आले आहेत. दररोज 2000 उमेदवारांना बोलावलं जातं, त्यांचे जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळ्याचे दिवस पाहता पाणी, ओआरएस फळ बिस्किट यांची सुद्धा वाटप करतो. उमेदवारांसाठी शहर वाहतूक व्यवस्थेच्या मदत घेतली आहे रात्रीचे उमेदवार येतात त्यांना आम्ही वाहन पाठवतो. सकाळी चार वाजता शंभर मीटर पाच किलोमीटर साठी रनिंग प्रक्रिया सुरू होते. आरोग्याची काळजी घेण्यासाठी टीम मेडिकल टीम उपलब्ध आहेत. 7 मे पर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. इंजीनियरिंग, बीएससी ऍग्री, बी फार्म वाले उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत.
SRPF च्या 291 जागेसाठी भरती प्रक्रिया
गट क्रमांक 20 साठी ही भरती
जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील एसआरपीएफ साठी भरती
या पदासाठी एकूण 75 हजार अर्ज
राहण्याची व जेवण्याची निशुल्क व्यवस्था