Cockroach Janta Party चे अभिजीत दिपके उद्या भारतात, आई-वडिलांनी का सोडले घर?

Cockroach Janta Party Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे 6 जून रोजी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होत आहे. तिथून ते थेट जंतर-मंतर मैदानावर पोहचतील. या ठिकाणी त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.

Cockroach Janta Party चे अभिजीत दिपके उद्या भारतात, आई-वडिलांनी का सोडले घर?
कॉकरोच जनता पार्टी, अभिजीत दीपके
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 04, 2026 | 12:51 PM

Cockroach Janta Party Abhijeet Dipke: अमेरिकेतील बोस्टन इथं शिक्षणासाठी गेलेले अभिजीत दीपके हे उद्या दिल्लीत दाखल होत आहे. त्यांच्या कॉकरोच जनता पार्टीला ऑनलाईन भरभरून प्रतिसाद मिळाला. आता दीपके यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. उद्या 6 जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर इथे ते मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी तरुणांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. तर काही जण दीपके यांना विमानतळावरच अटक होण्याची भीती व्यक्त करत आहेत. दरम्यान राज्यात छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.

कुटुंबिय अज्ञात स्थळी

अभिजीत दीपके कॉकरोच जनता पार्टीमुळे देशभरात प्रसिद्ध झाले. त्यांच्या ऑनलाईन चळवळीला मोठा प्रतिसाद मिळाला. डिजिटल फॉलोअर्समध्ये या नवख्या चळवळीने काँग्रेससह भाजपला मागे टाकले. आता अभिजीत दीपके उद्या नवी दिल्ली विमानतळावर येत आहेत. तिथून ते जंतरमंतर येथे जातील. तर छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी परिसरातील त्यांच्या घरी शुकशुकाट आहे. त्यांचे कुटुंबिय गेल्या काही दिवसांपूर्वीच अज्ञात स्थळी गेले आहे. त्यांच्या घरी आता कोणी नाही. तर सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

आता समजावून सांगण्यात काय हाशील?

अभिजीत यांचे वडील भगवानराव दीपके हे गेल्या वर्षी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातून(MIDC) अभियंता पदावरून निवृत्त झाले आहेत. मुलाने सुरू केलेल्या या चळवळीने ते चिंतेत आहेत. “एक वडील म्हणून मला चिंता वाटणे स्वाभाविक आहे. सुरुवातीला अशा प्रकारची चळवळ, अभियान सुरू करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्यास मी त्याला सांगितले होते. त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण एखाद्या व्यक्तीने जर काही निश्चय केला तर त्याला काही समजून सांगणे कठीण होते. पण मला खात्री आहे की, तो कायद्याचे कुठलेही उल्लंघन करणार नाही.”

कुणीही धमकी दिलेली नाही

अभिजीत दीपके यांच्या वडिलांनी सांगितले की, त्यांना, कुटुंबियांना कुणीही धमकी दिलेली नाही. पण आई-वडील म्हणून चिंता वाटणे स्वाभाविक आहे. अभिजीत याला कायद्याची चांगली समज आहे. तो कायद्याचे कोणतेही उल्लंघन करणार नाही. तर अभिजीत याला अटकेची कल्पना आहे, त्याने त्यासाठी तयारी केली आहे. तर मदतीसाठी त्याने आपल्याला फोन केल्याची माहिती मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे यांनी दिली आहे.

Follow Us