AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: आता अण्णा हजारे यांनी जंतरमंतरवर जावे आणि झुरळांना… संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

Sanjay Raut on Anna Hazare- Cockroach Janta Party: गेल्या महिन्यात कॉकरोच जनता पार्टी उदयास आली. तिच्यावर तातडीने सरकारने डिजिटल कार्यवाही केली. तर उद्या दिल्लीत आंदोलनाची हाक या पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिली आहे. त्याचवेळी राऊतांनी अण्णा हजारे यांना मोठे आवाहन केले आहे.

Sanjay Raut: आता अण्णा हजारे यांनी जंतरमंतरवर जावे आणि झुरळांना... संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
संजय राऊत, अण्णा हजारे, अभिजीत दीपके, कॉकरोच जनता पार्टीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 04, 2026 | 11:22 AM
Share

Sanjay Raut Appeal to Anna Hazare: देशाच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीनंतर कॉकरोच जनता पार्टीचा गेल्या महिन्यात उदय झाला. या डिजिटल चळवळीने पाहता पाहता मोठा विक्रम केला. केंद्र सरकारने तातडीने डिजिटल कार्यवाही केली. तर आता या आंदोलनाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी उद्या दिल्लीत जंतर मंतर येथील मैदानावर आंदोलनाची हाक दिली आहे. 6 जून रोजी देशाच्या शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि इतर मुद्यांवर आंदोलन होणार आहे. या सर्व घडामोडींवर उद्धव सेनेच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना मोठे आवाहन केले आहे.

आता अण्णा हजारे यांनी झुरळांना द्यावेत आशीर्वाद

कॉकरोच जनता पार्टी ही एक चळवळ आहे. सोनम वांगचुक यांचा कोणताही पक्ष नाही. पण हे राष्ट्र वाचवण्यासाठी काही लोक एकत्र येत असतील तर त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या पाहिजेत , अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात जाण्याविषयी विचार करू. मुळात हे एक आंदोलन आहे. त्याचे राजकीय व्यासपीठ होता कामा नये. गोंधळ होता कामा नये, असे राऊतांनी मत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्लीत जाऊन या झुरळांना पाठिंबा द्यावा. आम्ही स्वागत करू. राळेगणमधून त्यांनी आता दिल्लीत जावं आणि जंतरमंतरवर जे तरूण जमणार आहेत, त्यांना आशीर्वाद द्यावेत, असे मोठे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

ही तर एकपक्षीय राजवटीकडील वाटचाल

देशभरात एकपक्षीय राजकारणाची मुहूर्तमेढ असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी बंगालमधील टीएमसीच्या फुटीबाबत दिली. कोणताही प्रादेशिक पक्ष अथवा अन्य पक्ष राहणार नाही. या दृष्टीने त्यांनी महाराष्ट्रात पैशाच्या, निवडणूक आयोगाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या ताकदीने शिवसेना फोडली. त्यानंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला. त्याआधी पासवान यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. आता पश्चिम बंगालमध्ये तोच पॅटर्न राबवला. टीएमसी फोडली. हा देशासाठी चांगली गोष्ट नाही. याचा अर्थ तुम्ही राष्ट्र प्रेमी नाहीत. तुम्ही संविधान प्रेमी नाहीत. तुम्ही व्यापारी आहात. तुम्हाला राजकीय फायदा हवा आहे. त्या पद्धतीने तुम्ही पक्ष फोडत आहात. तुम्ही ममता बॅनर्जी यांच्या लोकांवर हल्ले करत आहात. पक्ष फोडत आहात, याचा अर्थ आम्ही या देशात काही करू शकतो हा संदेश तुम्ही देत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

Follow Us
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात