AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बैलगाडा शर्यत: फॉर्च्युनर जिंकणाऱ्या हेलिकॉप्टर बैज्याचा खुराक नेमका आहे तरी काय? वाचा…

Bailgada Sharyat: डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. हेलिकॉप्टर बैज्या व ब्रेक फेल या बैलजोडीने मानाची फॉर्च्युनर पटकावली आहे. आज आपण हेलिकॉप्टर बैज्याचा खुराक काय आहे ते जाणून घेऊयात.

बैलगाडा शर्यत: फॉर्च्युनर जिंकणाऱ्या हेलिकॉप्टर बैज्याचा खुराक नेमका आहे तरी काय? वाचा...
Helicopter Baijya
| Updated on: Nov 10, 2025 | 6:07 PM
Share

सांगलीतील बोरगावमध्ये देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पार पडली. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. या शर्यतीत शेकडो बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. मात्र हेलिकॉप्टर बैज्या व ब्रेक फेल या बैलजोडीने मानाची फॉर्च्युनर पटकावली आहे. आज आपण हेलिकॉप्टर बैज्याचा खुराक काय आहे? तो शेतात काम करतो का? त्याच्या नावामागे नेमकी काय कहाणी आहे याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेक फेल बैलजोडीने फॉर्च्युनर जिंकली

सांगलीत पार पडलेल्या या शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते मंडळी आणि बैलगाडा शर्यतप्रेमी उपस्थित होते. शर्यतीच्या मैदानाला जत्रेचे स्वरूप आले होते. कोल्हापूरच्या शिरोळचे बाळू दादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैज्या आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेक फेल बैलजोडीने फॉर्च्युनर गाडी जिंकली आहे. तसेच इतर बैलजोड्यांनाही थार आणि इतर बक्षीस देण्यात आले आहे.

बाळू दादा हजारे यांच्या हेलिकॉप्टर बैज्याने आतापर्यंत बरीच मैदाने मारली आहेत. गेल्या चार वर्षांत त्याने दीडशेपेक्षा जास्त शर्यतींमध्ये भाग घेतला आहे, यातील बऱ्याच शर्यती त्याने जिंकल्या आहेत. या ट्रॅक्टर, थार, रोख रक्कम, गदा आणि इतर बक्षि‍सांचा समावेश आहे. त्यामुळे शर्यतीच्या मैदानात या बैलजोडीची नेहमीच चर्चा असते.

बैज्याचा खुराक काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर बैज्याच्या देखभालीसाठी 2 ते 3 लोक आहेत. शर्यतीच्या बैलांना शेतकामासाठी वापरले जात नाही, त्याला दोन देवसातून एकदा अर्ध्या तासासाठी औताला जुंपले जाते. बैज्याच्या आहाराबाबत बोलताना बाळू हजारे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, बैज्याचा खुराक सामान्य आहे, त्याला चारा आणि इतर जनावरे खातात तेच खाद्य दिले जाते. शर्यतीत धावणाऱ्या अनेक बैलांना दूध पाजले जाते, मात्र बैज्याला दूध पाजले जात नाही असंही हजारे यांनी सांगितले.

नाव कसं पडलं?

हेलिकॉप्टर बैज्या हा आपल्या वेगासाठी ओळखला जातो, बैज्या तुफान पळतो, हेलिकॉप्टरसारखा जातो म्हणून पोरांनी त्याला हेलिकॉप्टर बैज्या म्हणायला सुरूवात केली, त्यामुळे बैज्याला हेलिकॉप्टर बैज्या असं नाव पडलं अशी माहितीही हजारे यांनी दिली आहे. या बैज्यामुळे आता हजारे यांचं नाव राज्यभर गाजत आहे. काही दिवसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस दिले जाणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...