ज्ञानदान करणाऱ्या शाळेला राजवाड्याचं रुप आलं तर? या गावानं हा सुंदर विचार प्रत्यक्षात उतरवलाय

| Updated on: Mar 14, 2023 | 1:07 PM

एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती ढासळत असतांना विद्यार्थी संख्या टिकून कशी ठेवायची अशी परिस्थिती मुख्याध्यापकांवर असतांना सांगलीतील एका गावाने भन्नाट संकल्पना राबविली आहे.

ज्ञानदान करणाऱ्या शाळेला राजवाड्याचं रुप आलं तर? या गावानं हा सुंदर विचार प्रत्यक्षात उतरवलाय
Image Credit source: Google
Follow us on

सांगली : शिक्षणामुळे जीवनाचा कायापालट होतो असं म्हंटलं जातं. त्यामुळे सर्वात अमूल्य असं दान असलेल्या ज्ञानदान करणाऱ्या शाळांचा कायापालट केला तर उत्तम प्रकारचे शिक्षण मिळू शकते. त्यासाठी वातावरण देखील चांगले निर्माण होते. असाच विचार मनात आल्याने शाळेचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. जिल्हा परिषदेची शाळेला थेट राजवाड्याचे रूप देण्यात आले आहे. सध्या हीच शाळा संपूर्ण सांगलीत चर्चेचा विषय ठरत असून लक्षवेधी ठरत आहे. आनंददायी वातावरण मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी अधिक निर्माण होणार आहे. खरंतर यापूर्वी जिल्हा परिषदेची शाळा ही जुन्या वाड्यातच भरली जायची. त्यामुळे वाड्याचा आनंददायी अनुभव आत्ताही कायम राहवा यासाठी पुन्हा राजवाड्याचे रूपं शाळेला देण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील समडोळी गावात जिल्हा परिषदेची शाळा ही वाड्यातच भरली जायची नंतरच्या काळात शाळेची परिस्थिती बदलत गेली. त्यानंतर कोरोनाची महामारी आली. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना शाळेत आणणे मोठं आव्हान होतं.

पण शाळेचे मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे आणि गावकऱ्यांनी एकत्र येत भन्नाट विचार केला. वाड्यात सुरू असलेली शाळा वाड्यात सरू करायची पण नव्या रंगात नव्या ढंगात ही शाळा करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

जुन्या वाड्यात सुरू असलेली शाळा आता अद्ययावत करण्यात आली आहे. नव्या पद्धतीने राजवाडा साकारण्यात आला आहे. विद्यार्थ्याना देखील शाळेबद्दल आकर्षण वाटू लागले आहे. शाळेचा चेहरा मोहराच बदलून गेला आहे.

अत्याधुनिक साधने वापरुन जुन्या काळातील वाडा पुन्हा उभा राहिला आहे. गावकऱ्यांची संपूर्ण संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रसिद्ध मुंबईचे प्रख्यात चित्रकार चंद्रकांत सुतार यांनी काम केले आहे. विविध चित्रे काढली जात आहे. त्यामध्ये ऐतिहासिक बाबी मांडल्या जात आहे.

जुन्या काळातील काही संदर्भ भिंतीवर रेखाटले जात आहे. त्यामध्ये बैठकीसाठी उत्तम प्रकारची चटई टाकण्यात आली असून डिजिटल पद्धतीने शिक्षण देण्यावर भर असणार आहे. शाळेचे संपूर्ण रंगकाम झाले असून शाळा म्हणजे एक राजवाडाच वाटू लागला आहे.

या शाळेने अनेक अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी प्रत्यक्ष भेटी देऊन शाळेच्या संपूर्ण कामकाजावर स्तुतीसुमने उधळली आहे. यामध्ये गटशिक्षणाधिकारी गणेश बांबुरे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रद्धा कुलकर्णी आणि सहायक शिक्षक संचालक नामदेव माळी यांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक केलंय.