AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…आणि रोहितच्या पँटच्या खिशात 100 तोळं सोनं, तर संतोषकडे 99.4 तोळं, सांगली पोलीसही चक्रावले

सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून दोन्ही तरुणांकडून तब्बल 1 कोटी 5 लाख रुपये किंमतीच्या दोन किलो सोनं जप्त केलंय.

...आणि रोहितच्या पँटच्या खिशात 100 तोळं सोनं, तर संतोषकडे 99.4 तोळं, सांगली पोलीसही चक्रावले
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: सोशल मीडिया
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 19, 2022 | 11:53 PM
Share

शंकर देवकुळे, सांगली : सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील ग्रामपंचायत परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून दोन तरुणांकडून 1 कोटी 5 लाख रुपये किंमतीच्या 2 किलो सोन्याच्या विटा जप्त केल्या आहेत. दोन्ही संशयित कवलापूर येथील असून त्यांनी संबंधित सोने जालना येथील सराफाचे असल्याची कबुली दिलीय. या सोन्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा सादर करता न आल्याने ते जप्त करण्यात आले. रोहित तानाजी चव्हाण (वय 27) आणि संतोष अशोक नाईक (वय 26) अशी संशयिताची नावे आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गस्त घालून संशयितांवर कारवाई करण्याचे आदेश एलसीबीला दिले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तैनात होते.

एक पथक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस नाईक इम्रान मुल्ला, सचिन धोत्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.

पोलिसांना कवलापूर ग्रामपंचायतीसमोर गुलाबी रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाचे जर्किन घातलेले दोघे तरुण संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली.

पोलीस पथकाने तातडीने कवलापूर ग्रामपंचायत परिसरात छापा टाकून रोहित चव्हाण आणि संतोष नाईक या दोघांना ताब्यात घेतले. दोघांची झडती घेण्यात आली.

रोहितच्या पँटच्या खिशात 100 तोळे (एक किलो), तर संतोषकडे 99.4 तोळे अशा दोन किलोच्या सोन्याच्या विटा मिळून आल्या. त्यांची किंमत तब्बल 1 कोटी 5 लाख 68 हजार रुपये आहे.

या सोन्याबाबत पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली. हे सोने बांबवडे येथील सराफी मित्र विक्रम लक्ष्मण मंडले (सध्या रा. जालना) यांचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी मंडले यांच्याशीही संपर्क साधला असता त्यांच्याकडे मालकी हक्काबाबत कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत. त्यामुळे एलसीबीच्या पथकाने सोने जप्त केले आहे. संशयित दोन्ही तरुणांना सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Follow Us
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?