Sanjay Raut-Raj Thackeray Meet : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल, दोघांमध्ये महत्वाची चर्चा

Sanjay Raut-Raj Thackeray Meet : सध्या देशातील वातावरण तापत चाललं आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांच्या मनात रोष निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आक्रमक आंदोलनं सुरु आहेत. राजीनाम्यासाठी विरोधकांची एकजूट दिसून येतेय.

Sanjay Raut-Raj Thackeray Meet : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल, दोघांमध्ये महत्वाची चर्चा
Raj Thackeray-Sanjay Raut
| Updated on: Oct 15, 2026 | 12:48 PM

दिनेश दुखंडे, प्रतिनिधी : सध्या देशातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दिल्लीमध्ये दररोज आंदोलनं सुरु आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेदाचं वृत्त समोर आल्यापासून देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातील दोन सहआयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा केला होता. SIR च्या मुद्यावरुन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत. देशातील विरोधी पक्ष एकजूट झाले आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आक्रमक आंदोलनं सुरु आहेत. काँग्रेस आणि कॉकरोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मागच्या आठवड्यात दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे, मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आलेली.

दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांची एकजूट दिसून येतेय. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्रित विराट मोर्चा काढला होता. त्यानंतर आता ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेकडून स्वाक्षरी मोहिम राबवली जात आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत आज राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचले.

Loading...

संजय राऊत हे दिल्लीच्या आंदोलनात

संपूर्ण देशात विरोधी पक्षांचं आंदोलन सुरु आहे. विरोधी पक्षाला ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा हवा आहे, त्यासाठी हे आंदोलन सुरु आहे. विरोधी पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. संजय राऊत हे दिल्लीच्या आंदोलनात होते. ते स्वत: दिल्लीला गेलेले. राज ठाकरे स्वत: ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात आंदोलनात उतरले आहेत. मनसेची स्वाक्षरी मोहिम सुरु आहे. दिल्लीत विरोधकांची एकजूट दिसतेय. संजय राऊत हे राज ठाकरेंना भेटून दिल्लीत घडणाऱ्या सर्व घडामोडींबद्दल माहिती देऊ शकतात.

मविआला अनुकूल भूमिका

राज ठाकरे अजून अधिकृतपणे महाविकास आघाडीत सहभागी झालेले नाहीत. पण त्यांची भूमिका मविआला अनुकूल आहे. देशात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात ते सहभागी होत आहेत. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us