Sanjay Raut : निवडणूक आयोगाने शेण खाल्लं, आमच्या पक्षाला, कोर्टातील सुणावणीनंतर संजय राऊतांचा संताप!

संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाला विकून टाकलं, असा संताप राऊतांनी व्यक्त केला. तसेच आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले.

Sanjay Raut : निवडणूक आयोगाने शेण खाल्लं, आमच्या पक्षाला, कोर्टातील सुणावणीनंतर संजय राऊतांचा संताप!
sanjay raut on supreme court hearing
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 13, 2026 | 4:37 PM

Sanjay Raut : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहेत. निवडणूक आयोगाने चूक केली. आयोगाने चुकीच्या आधारावर निर्णय घेतला, असं सिब्बल यांनी न्यायालयाला पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रतही न्यायालयात सादर केली. दरम्यान, आजच्या जोरदार युक्तिवादानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. निवडणूक आयोगाने शेण खाल्लं असा हल्लाबोल राऊतांनी केला.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

आजचा युक्तिवाद हा निवडणूक आयोगाच्या प्रत्येक बेकायदेशीर कृत्याबाबत होता. देशातील आयोगाने निष्पक्षपणे काम करण्याची जबाबदारी संविधानानुसार घेतली आहे. त्या आयोगाने शिवसेनेबाबतीत पक्षपाती निर्णय घेतले. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे खंडपीठाचं समाधान झालं, असं मला वाटतं. आमच्यावर अन्याय झालाय, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली

तसेच, निवडणूक आयोगाने शेण खाल आहे. हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. देशाच्या संविधानावर हात ठेवून हा भ्रष्टाचार करण्यात आला, असा गंभीर आरोपही यावेळी राऊतांनी केला. निवडणूक आयोगाने बेकायदेशीर मार्ग तयार केला. त्या मार्गाच्या आधारे निर्णय घेण्यात आला आणि बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली. त्यांनाही चिन्ह देण्यात आले, असाही दावा त्यांनी केला.

अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत आयोगाने…

निवडणूक आयोगाने निर्णय आधीच ठरला होता. फार मोठे षड्यंत्र रचले गेले. निकाल आधी ठरला आणि नंतर हे लोक गुवाहाटीला गेले. पक्षफुटीचा आणि अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत आयोगाने निर्णय घेणे अपेक्षित नव्हते. ED आणि CBI वापरून आमदारानं कसे वळवले गेले, यावर सिब्बल यांनी युक्तिवाद केला, अशी माहिती राऊतांनी दिली.

निवडणूक आयोग हा भाजपचा एजंट

जिथे धर्म तिथे जय, असे सुप्रीम कोर्टाच्या शिरोभागी लिहिले आहे. निवडणूक आयोग हा भाजपचा एजंट आहे.  मुळात पक्ष आणि चिन्हाचा निर्णय लागेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मंगळवारी देखील आमचाच युक्तिवाद होईल अशी माहिती दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us