AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सापाचं तुटलेलं डोकंही अत्यंत विषारी, दंश करताच ओढवू शकतो मृत्यू; गूढ काय?

सापाचं डोकं धडापासून वेगळं झाल्यावरही ते अत्यंत विषारी असतं आणि दंश करून जीव घेऊ शकतं. शीतरक्त असल्याने आणि मंद चयापचयमुळे पेशी व स्नायू तास न् तास जिवंत राहतात. मज्जासंस्थेतील रिफ्लेक्समुळे ते अनैच्छिकपणे दंश करतात. यात विषग्रंथींमधील पूर्ण विष सोडलं जातं, जो सामान्य दंशापेक्षा अधिक जीवघेणा असतो.

सापाचं तुटलेलं डोकंही अत्यंत विषारी, दंश करताच ओढवू शकतो मृत्यू; गूढ काय?
snakeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 26, 2026 | 6:04 PM
Share

नुसता साप दिसला तरी अनेकांना फेफरे भरते. अनेकजण थरथर कापतात. कारण सापाने चावा घेतला तर मृत्यू अटळ हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच लोक सापाला घाबरतात. पण साप मारला किंवा त्याचं डोकं धडापासून वेगळं केलं, तर धोका संपला असं म्हणता येईल का? तर अजिबात नाही. डोकं तुटलेला साप सुद्धा तास न् तास जिवंत राहू शकतो. धक्कादायक म्हणजे धडापासून वेगळ्या झालेल्या डोक्याने जरी दंश केला तरी माणूस मरू शकतो. कारण त्याच्या दंशात विष असतं. जगभरात घडलेल्या अनेक घटना आणि शास्त्रज्ञांचे संशोधन यातून हे धक्कादायक सत्य समोर आलं आहे. मेलेल्या सापाचं डोकं इतकं धोकादायक का ठरतं, हे तपासलं तर रंजक वैज्ञानिक तथ्यं समोर येतात.

डोकं तुटलं तरी दंश कसा करतो?

माणसाचं किंवा इतर सस्तन प्राण्यांचं डोकं धडापासून वेगळं झाल्यावर काही सेकंदांतच रक्ताभिसरण बंद होतं आणि मेंदू मरतो. परंतु साप आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांची शरीररचना पूर्णपणे वेगळी असते. साप हे शीतरक्ताचे प्राणी असल्यामुळे त्यांचा चयापचय दर (मेटाबॉलिझम) खूप मंद असतो. त्यांना सस्तन प्राण्यांप्रमाणे जास्त ऑक्सिजन किंवा सतत रक्तप्रवाह लागत नाही. डोकं तुटल्यानंतरही त्यांच्या पेशी आणि स्नायू हळूहळू प्रतिसाद देत तास न् तास जिवंत राहतात. सापाचा मेंदू काम करेनासा झाला, तरी त्याच्या डोक्यातील मज्जासंस्था स्वतंत्रपणे कार्य करण्यास सक्षम असते.

आजूबाजूला काही हालचाल, उष्णता किंवा स्पर्श जाणवताच मज्जासंस्थेतील रिफ्लेक्स आर्क अनैच्छिक प्रतिक्रिया म्हणून तत्काळ प्रतिसाद देतो आणि तोंड उघडून दंश करण्यासाठी स्नायूंना आदेश देतो. रॅटलस्नेक, वायपर यांसारख्या विषारी सापांच्या चेहऱ्यावर उष्णता ओळखणारे खास पिट ऑर्गन्स असतात. डोकं तुटून पडलेलं असलं तरी जवळ असलेल्या माणसाच्या हाताची किंवा पायाची शारीरिक उष्णता हे सेन्सर्स टिपतात आणि लगेच हल्ल्यासाठी सज्ज होतात.

जास्त प्रमाणात विष सोडण्याचा धोका

जिवंत साप दंश करताना शरीरात किती विष सोडायचं हे मेंदूद्वारे नियंत्रित करू शकतो. पण डोकं तुटलेल्या सापाकडे ही मज्जासंस्थेची नियंत्रण क्षमता नसते. परिणामी, रिफ्लेक्स क्रियेतून दंश झाला की विषग्रंथींमधील संपूर्ण विष एकाच वेळी पीडिताच्या शरीरात सोडलं जातं. हा परिणाम सामान्य दंशापेक्षा जास्त जीवघेणा ठरू शकतो.

घटना काय साांगतात?

यापूर्वी चीन, अमेरिका आणि इतर देशांत साप मारून शिजवण्यासाठी तयार करताना, किंवा जंगलात डोकं कापलेला साप फेकून देण्याचा प्रयत्न करताना अनेक लोकांना अशा तुटलेल्या डोक्यांनी दंश केला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने उपचार घ्यावे लागले. काही जण मरणाच्या दारातून परतले आहेत.

इशारा काय?

साप मारला असला किंवा डोकं तुटलेल्या अवस्थेत सापडला असला, तरी त्याला हातांनी स्पर्श करणं किंवा त्याच्या जवळ जाणं टाळा. त्याने धोका होऊ शकतो, असा इशारा वन्यजीव तज्ज्ञांनी दिला. अशा परिस्थितीत लांब काठी, फावडं किंवा सुरक्षा साधनांचा वापर करून त्याचं निरीक्षण करणं, किंवा तातडीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवलं पाहिजे, असा सल्लाही या तज्ज्ञांनी दिला आहे.

Follow Us
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार...
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, क्लिप बनवणारा.
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, ही क्लिप बनवणाऱ्या व्यक्तीबाबत मोठी माहिती
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना...
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना फडणवीसांची स्पष्ट भूमिका
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी;
LIVE Vote Counting of MLC Election Results 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी; LIVE अपडेट्स एका क्लिकवर!
मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडला! मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत,
मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडला! मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत, कारण...
आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान
Tulja Bhavani Temple : आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान; तुळजापुरात भक्तीमय वातावरण
मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली
Mumbai Local Train Update : मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली; चाकरमान्यांचे हाल
महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा
Raj Thackeray : महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… राज ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा; नेमकं काय म्हणाले?