मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर गुन्हे दाखल करा, संजय राऊत यांची थेट मागणी, लाडकी बहीण योजनेत..

संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, कोर्ट आमचे ऐकत नाही. कोर्टात संघाचे लोक भरले आहेत. यासोबतच लाडक्या बहिणी योजनेच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर गुन्हे दाखल करा, संजय राऊत यांची थेट मागणी, लाडकी बहीण योजनेत..
Sanjay Raut
| Updated on: Jun 02, 2026 | 11:13 AM

तब्बल 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले. सरकारच्या घेतलेल्या या निर्णयानंतर मोठा हंगामा उडाला. यादरम्यानच शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोला केला. राऊतांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जनतेच्या तिजोरीचा अपहार करून अपात्र महिलांना पैसे देऊन मते विकत घेतली. ही निवडणूकच रद्द व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने महिलांची मते विकत घेतली. विकत घेतली इथपर्यंत ठीक आहे. पण अपात्र 80 लाखाच्या वर अपात्र महिलांना तुम्ही सरकारी तिजोरीतून पैसे दिले हे आता सिद्ध झाले. लाडकी बहीण योजनेचा अपहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे जे त्रिकुट होते, त्यांच्यावरती सरकारी तिजोरीच्या अपहाराचा गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. पण हे मोदी युग आहे. हे कलियुगपण नाही ना… हे मोदी युग आहे. मोदी युगामध्ये जर हे होणार असेल तर त्याचे स्वागत करू आम्ही. मी या निवडणुकीच्या प्रक्रियेत अजिबात पडलो नाहीये. राज्यातील निवडणुका कशा होतात, हे तुम्हालाही माहिती आहे.

संजय राऊत यांनी पुढे म्हटले की, एखादी निवडणूक हारली म्हणजे शिवसेना कमकुवत झाली, असे नाही. आता निवडणुका नाहीत, त्यामुळे पक्षबांधणीचे काम सुरू. काँग्रेसवाले आपली संस्थानं वाचवण्यासाठी शेपट्या घालून भाजपमध्ये गेले. या लोकांना पक्ष नसतो, जिकडे हवा तिकडे हे लोक जातात. उद्या केंद्रात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सरकार आले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर हेच लोक आमच्या पायाशी लोटांगण घालतील.

सत्तार यांच्याबद्दल बोलताना राऊतांनी म्हटले की, भाजप स्लो पॉइजन आहे असं एक गृहस्थ म्हणाले.. पॉइजन काय असते हे त्यांना कळेल आता. सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल. त्यामुळेच निकाल लांबवला जातोय.
ज्यांना पश्चाताप होतोय, त्यांनी परत यावं. मात्र काही लोकांना प्रवेश मिळणार नाही. शिवसेना पक्ष सुनावणीवर राऊत बोलले. विखे पाटील आमच्याही पक्षात आले होते. आम्हाला सोडून गेले, तेंव्हाच आम्ही त्यांना श्रद्धांजली दिली.

विखे पाटील अनेक पक्ष फिरले, भाजपमध्ये किती दिवस राहतील. सत्ता बदलली की पक्ष बदलणारे हे लोक आहेत. भाजप हा शेतकरी विरोधी आणि उद्योगपती धार्जिणा पक्ष आहे, असं ज्यांना वाटतं त्यांनी मातोश्रीवर यावं. भाजपमध्ये अनेकजण आयात केलेले. भविष्यात भाजपाचा अध्यक्ष बाहेर देशातील झाला तर नवल वाटायला नको. कोर्ट सत्ताधाऱ्यांच गुलाम. सगळे संघाचे लोक भरलेत. आमच ऐकलं जात नाही. शिंदे गटातील काही लोकांना पश्चाताप होत असेल, तर त्यांनी आमच्याकडे परत यावं, असेही राऊतांनी म्हटले.

Follow Us