काँग्रेस पक्ष ही स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी, त्यांच्याशिवाय स्वातंत्र्य इतिहास लिहिला जाऊ शकत नाही : संजय राऊत

काँग्रेस, राष्ट्रवादी हे पाकिस्तानमधले पक्ष आहेत का ? माझी शरद पवार यांच्यावर श्रद्धा आहे. या सरकारला कुणी खिचडी म्हणत नाही. निकाल लावण्याआधीच बाळ जन्माला घालायचे ठरलं होते, असं म्हणत संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला.  

Sanjay Raut on Congress, काँग्रेस पक्ष ही स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी, त्यांच्याशिवाय स्वातंत्र्य इतिहास लिहिला जाऊ शकत नाही : संजय राऊत

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज पुण्यात प्रकट मुलाखत झाली. लोकमत दैनिकाकडून घेण्यात आलेल्या या मुलाखतीत संजय राऊत यांनी विविध मुद्द्यावर रोखठोक मतं व्यक्त केली.  काँग्रेसबाबत बोलताना संजय राऊत (Sanjay Raut on Congress) यांनी स्तुतीसुमनं उधळली.

“आम्ही त्यावेळी सोनियावर टीका केली. काळाच्या ओघात केली. शरद पवारांनी त्या मुद्द्यावर पक्ष स्थापन केला. त्यांचे वय 70 झाले आहे. काँग्रेस पक्ष हा परदेशी पक्ष नाही ना ? काँग्रेस पक्ष ही स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी आहे. काँग्रेसशिवाय स्वातंत्र्य इतिहास लिहला जाऊ शकत नाही”, असं संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut on Congress)

काँग्रेस, राष्ट्रवादी हे पाकिस्तानमधले पक्ष आहेत का ? माझी शरद पवार यांच्यावर श्रद्धा आहे. या सरकारला कुणी खिचडी म्हणत नाही. निकाल लावण्याआधीच बाळ जन्माला घालायचे ठरलं होते, असं म्हणत संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अंदाज आला होता की भाजप शब्द पाळणार नाही. दिल्लीत वातावरण फार आशादायक आहे असं वाटत नाही. लोकांच्या मनातील भीती दूर करणे हे सामुदायिक काम आहे, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

दिल्लीत वातावरण फार आशादायक आहे असं वाटत नाही. मी स्वतः जेएनयूत जाणार आहे. ते देशाचे विद्यार्थी आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण गेली इतर अभिनेते कुठे आहेत? सलमान, शाहरुख, आमीर कोणत्या भीतीखाली आहेतय़ का भूमिका घेत नाही ? कलाकार म्हणून व्यक्त व्हायला हवे. अनुपम खेर प्रवक्ते आहेत. त्यांना भूमिका मांडावी लागते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *