Sanjay Raut : ‘माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, पण मला..’ तुकाराम मुंढे यांच्या खात्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर राऊतांची स्पष्ट भूमिका

Sanjay Raut : तुकाराम मुंढे चांगलं काम करतायत. पण त्यांच्या खात्याबद्दल संजय राऊत यांनी काही गौप्यस्फोट केले आहेत. आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असल्याचाही राऊतांचा दावा आहे.

Sanjay Raut : माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, पण मला.. तुकाराम मुंढे यांच्या खात्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर राऊतांची स्पष्ट भूमिका
Tukaram Mundhe-Sanjay Raut
| Updated on: Sep 28, 2026 | 1:11 PM

खासदार संजय राऊत यांनी आज FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या खात्यावर काही गंभीर आरोप केलेत. “तुकाराम मुंढे यांच्यावर माझा आक्षेप नाही. आपला घोडा पुढे जातो, भरधाव पुढे पळतो तेव्हा मागे वळून पाहिलं पाहिजे. सैन्य काय करतय,कसली लुटमार करतय. तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात आहात हे काम केल्याबद्दल. जनतेला फायदा झालेला आहे. किचन स्वच्छ झालय. भेसळयुक्त दूध मिळायचं त्यावर नियंत्रण आलं आहे. भेसळयुक्त पनीर मिळायचं त्यावर नियंत्रण आलं आहे. अनेक ठिकाणी सगळे प्रकार थांबलेत. त्यासाठी तुकाराम मुंढे यांचं अभिनंदन करावचं लागेल. तुकाराम मुंढे यांच्यामागे त्यांच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराचं रेटकार्ड वाढलं आहे. हे मी पुराव्यानिशी बोलतोय. मी पुराव्याशिवाय बोलत नाही” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

“म्हणजे तुम्ही नोटीसा देता. नोटीस दिल्यावर मुदत देता. सुधारणा करण्याची मागणी करता. कारवाई करता, त्यातून सुधारणा झाली नाही तर लायसन रद्द करता. आता लायसन रद्द झाल्यावर मग डिलिंग होतेय. पू्वी 8-9 हजारमध्ये व्हायचं. पण मुंडे आल्यापासून एफडीएला झळाळी आली आहे. रेट वाढले आहेत. माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. मला त्या खात्याची बदनामी करायची नाहीय. कारण मुंढे चांगलं काम करतायत. त्यांच्या पाठिमागे जी लूटमार सुरु आहे, त्याकडे पहावं. महापालिकेने नालेसफाई केली नाही की, उंदीर बाहेर पडतात त्यातून. हॉटेलवाल्यांना ब्लॅकमेल केलं जातय” असा दावा संजय राऊत यांनी केला.

Loading...

त्यांच्याकडून 10000 कोटींची फंडिग

“मोठमोठ्या फार्मा कंपन्यांवर सुद्धा धाडी घाला. या फार्मा कंपन्या हजारो कोटींच्या देणग्या देतात त्यांचा आवाज मोठा आहे. लहान दुकानदार, हॉटेल्सना आवाज नाहीय. फार्मा कंपन्या संघटित आहेत. त्यांचे प्रतिनिधी संसदेत आहेत. त्यांना हात लावला तर फडणवीस मुंडे यांची लगेच बदली करतील. फार्मा कंपन्यांना हात लागला तर दिल्लीतून मोदी-शाहंचा फोन येईल. त्यांच्याकडून 10000 कोटी, दोन हजार कोटींची फंडिंग दिली जाते. मुंडे यांची बदली केली जाईल. नोटीस द्या, त्यांच्याकडून सुधारणा करुन घ्या. तुम्ही थेट बंद करता त्यामध्ये रोजगार बुडतो. पंधरा दिवसाची मुदत द्या सुधारणा करण्यासाठी ते नाही केलं तर लायसन्स रद्द करा. पहिल्या पाच मिनिटात लायसन्स रद्द करता हे खाद्यपदार्थांच्या बाबतीत ठरवून केलं जातय” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us