डीजेवर बंदी आणताच येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी थेट सांगितले कारण..
डीजेवरील बंदी हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. पुण्यात डीजेवर बंदीची मागणी केली जात आहे. काही लोक याचे समर्थन करत आहेत, तर काही लोक विरोध. त्यातच आता साताऱ्याच्या एसपींनी यावर मोठे विधान केले.

पुण्यात गणेशोत्सवात डीजे बंदीच्या मागणीवरून वाद पेटला आहे. प्रत्येकाची मते याबाबत वेगवेगळी आहेत. काल पुण्यात डीजेविरोधात मोठा मोर्चा लोकांनी काढला. अनेक समस्या लोकांनी मांडल्या. नागरिकांकडून डीजे बंदीची मागणी केली जात आहे. दुसरीकडे गणेश मंडळाकडून डीजे बंदीच्या मागणीला विरोध होत आहे. सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनीही हा मुद्दा लावून धरला आहे. डीजे बंदीची मागणी करत असताना त्यांना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या रोषालाही सामोरे जावं लागले. हेच नाही तर भर कॅमऱ्यासमोर त्यांना मारहाण झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले. नागपूरमध्ये पूर्णपणे डीजेला बंदी आहे. मग नागपूरमध्ये बंदी होऊ शकते तर पुण्यात का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
डीजे बंदी होणार की नाही, असा सवाल वारंवार उपस्थित केला जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी डीजे विरोधात भूमिका घेतली. डीजेवर बंदी येऊच शकत नाही…असे मोठे विधान सातारा जिल्ह्याचे एसपी निखिल पिंगळे यांनी केले. सातारा जिल्ह्याचे एसपी निखिल पिंगळे यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. डाॅल्बीच्या आवाजाला परवानी पाहिजे तर सुचवला पर्याय, असेही त्यांनी म्हटले.
राज्यात डीजेवर बंदी घालण्याबाबत जोरदार मागणी धरली असताना सातारा जिल्ह्याचे पोलिस प्रमुख निखिल पिंगळे यांनी डीजेवर बंदी येवूच शकत नाही, असे विधान केले आहे. त्यांनी डाॅल्बी आणि डीजे यामधील फरक सांगितला आहे. डाॅल्बी ही टेक्नालाॅजी असते, त्यावर सुप्रीम कोर्टाने बंदी घालायला कुठेच सांगितले नाही. फक्त आवाजाची मर्यादा ठेवा सांगितले आहे. तर डीजे मुक्ती होवूच शकत नाही.
कारण डीजे हा बाबा किंवा बाई पण असते. ती केवळ टेक्नालाॅजी चालवते. तेव्हा मुद्दा डाॅल्बीचा नाही, आवाजाचा आहे. तेव्हा ज्यांना डाॅल्बीला परवानगी पाहिजे, त्यांनी त्याच्या घरातील आज्जी- आजोबांना तेथे बसवावे मग परवानगी देवू असे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख निखिल पिंगळे यांनी गणेश मंडळांना केले.