सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निकाल : शशिकांत शिंदे-शंभूराज देसाईंना पराभवाचा धक्का, सहकारमंत्र्यांची बाजी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे, तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले आहेत.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निकाल : शशिकांत शिंदे-शंभूराज देसाईंना पराभवाचा धक्का, सहकारमंत्र्यांची बाजी
शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Satara District Bank Election) पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे 10 जागांच्या निकालांची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), शिवसेना आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये धक्कादायक निकाल लागले असून आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे, तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले आहेत.

जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. पाटण विकास सेवा सोसायटी गटात सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर विजयी झाले असून त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी राहिलेले  शिवसेना उमेदवार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव झाला.

काय आहेत निकाल?

प्राथमिक ऋषी पुरवठा विकास सेवा सहकारी संस्था धान्य अधिकोष सहकारी संस्था

जावली सोसायटी गट-

ज्ञानदेव रांजणे विजयी, आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव

49 मतांपैकी
ज्ञानदेव रांजणे – 25
शशिकांत शिंदे – 24
ज्ञानदेव राजणे 1 मताने विजयी

पाटण विकास सेवा सोसायटी गट-

सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर विजयी, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव

सत्यजित पाटणकर – 58
शंभूराजे देसाई – 44
सत्यजित पाटणकर 14 मतांनी विजयी

कराड सोसायटी गट –

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी, उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव

बाळासाहेब पाटील – 74
उदयसिंह उंडाळकर पाटील – 66
बाळासाहेब पाटील 8 मतांनी विजयी

कोरेगाव-

शिवाजीराव महाडीक-45
सुनील खत्री-45
समान मते

खटाव-

प्रभाकर घार्गे-56
नंदकुमार मोरे-46
प्रभाकर घार्गे 10 मतांनी विजयी

माण-

शेखर गोरे-36
मनोजकुमार पोळ-36
समान मते

नागरी बँक/नागरी सहकारी बँक

रामराव लेंभे-307
सुनील जाधव-47
रामराव लेंबे 260 मतांनी विजयी

इतर मागासवर्गीय सदस्य

शेखर गोरे-379
प्रदीप विधाते-1459
प्रदीप विधाते 1080 मतांनी विजयी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आठ वाजल्यापासून निकाल लागण्यास सुरुवात झाली. मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक दिग्गज मंडळींची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली होती.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक मतदान प्रक्रियेवर एक नजर

सातारा जिल्ह्यातून 96.33% मतदान…

जिल्ह्यात 1,964 मतदारांपैकी 1,892 मतदारांनी आपला हक्क बजावला

सातारा जिल्हा बॅंकेच्या 21 जागांपैकी 11 जागा बिनविरोध, 10 जागांसाठी मतमोजणी

जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीची पहिल्यापासून निर्विवाद सत्ता

मागील पंचवार्षिक निवडणुकीत 21 पैकी 19 उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत

विधानसभेच्या निवडणुकीनंतर 16 जागा राष्ट्रवादीकडे आहेत

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला

शिंदे-रांजणेंचे कार्यकर्ते भिडले

दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदानामध्ये तणाव पाहायला मिळाला होता. जावळी तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे चित्र मतदान केंद्रावर पहायला मिळाले होते. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या :

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राडा?, शशिकांत शिंदे-ज्ञानदेव रांजणे समर्थकांमध्ये वादावादी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपशिवाय समीकरणे अशक्य: भाजप नेत्यांचा दावा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI