सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपशिवाय समीकरणे अशक्य: भाजप नेत्यांचा दावा

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, भाजपलासोबत घेतल्याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेत कुणालाही समीकरणे करता येणार नाहीत. (Satara District bank)

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपशिवाय समीकरणे अशक्य: भाजप नेत्यांचा दावा
Satara District bank

सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, भाजपलासोबत घेतल्याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेत कुणालाही समीकरणे करता येणार नाहीत, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. (bjp will contest satara district bank election)

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपाला घेतल्या शिवाय कुणालाच आपलं समीकरण करता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपाचीही तयारी सुरू आहे. भाजपा नेते डॉ. अतुल भोसले यांनी भाजपाची सातारा जिल्ह्यातील ताकद वाढली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोणालाच आपलं समीकरण करता येणार नाही, अस वक्तव्य केलंय. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपा उतरल्यास राष्ट्रवादी काँग्रेसपुढंही कडवं आव्हान उभं राहणार हे निश्चित असल्याचं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.

निवडणुकीच्या ठरावावरुन अपहरण नाट्य

दरम्यान, सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावावरून माण तालुक्यात अपहरण नाट्याचे प्रकार पहायला मिळाले होते.बँकेच्या निवडणुकीच्या ठरावावरुन कायदा, सुव्यवस्था कोलमडून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. बँकेच्या निवडणुकीच्या ठरावानंतर डॉ.नानासाहेब शिंदे यांच्या अपहरणाचा तपास सुरु असताना आणखी दोन अपहरणाच्या घटना उघडकीस आल्या होत्या. माण तालुक्यातील पानवन येथील दोघांच्या अपहरणप्रकरणी शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.

गाडीची तोडफोड, अपहरण

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठरावावरून डॉ.नाना शिंदे यांच्या गाडीची तोडफोड करुन अपहरण करण्यात आलं होते. डॉ.नाना शिंदे हे पानवन गावच्या नवनिर्वाचित सरपंचांचे पती असल्याने राजकीय वादातून कृत्य झाले होते. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कुळकजाई विकास सेवा सोसायटीच्या ठराव प्रक्रियेदरम्यान 3 संचालकांना जबरदस्तीने गाडीत नेल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेखर गोरेंवर जानेवारी 2020 मध्ये दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. (bjp will contest satara district bank election)

 

संबंधित बातम्या:

पेटवून घेऊन जळत्या अंगाने थेट पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात धाव, पुण्यातील थरार

जयकुमार गोरे-शेखर गोरे पुन्हा आमनेसामने, एकमेकांविरोधात गुन्हे

दोन पक्षांची युती, मात्र सख्खे भाऊ पक्के वैरी, जयकुमार वि. शेखर गोरे एकमेकांविरोधात उभे!

(bjp will contest satara district bank election)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI