दोन पक्षांची युती, मात्र सख्खे भाऊ पक्के वैरी, जयकुमार वि. शेखर गोरे एकमेकांविरोधात उभे!

सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघात अनोखी लढत पाहायला मिळणार आहे (Man Vidhan Sabha constituency). या मतदारसंघात जयकुमार गोरे आणि शेखर गोरे हे दोन सख्खे भाऊ भाजप आणि शिवसेनेच्या तिकिटावर आमने सामने येणार आहेत (Jaykumar Gore vs Shekhar Gore). त्यामुळे ही लढत चांगलीच रंगतदार होणार आहे.

दोन पक्षांची युती, मात्र सख्खे भाऊ पक्के वैरी, जयकुमार वि. शेखर गोरे एकमेकांविरोधात उभे!

सातारा : सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघात अनोखी लढत पाहायला मिळणार आहे (Man Vidhan Sabha constituency). या मतदारसंघात जयकुमार गोरे आणि शेखर गोरे हे दोन सख्खे भाऊ भाजप आणि शिवसेनेच्या तिकिटावर आमने सामने येणार आहेत (Jaykumar Gore vs Shekhar Gore). त्यामुळे ही लढत चांगलीच रंगतदार होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती आहे (Shivsena-BJP Alliance), परंतु सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघात मात्र अजूनही युतीचं घोडं अडलेलंच दिसतं आहे. गुरुवारी (3 ऑक्टोबर) जोरदार शक्तीप्रदर्शन करत जयकुमार गोरे यांनी भाजपमधून उमेदवारी अर्ज दाखल केला, तर त्यांचेच बंधू शेखर गोरे यांनीही जोरदार शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेकडून अर्ज भरला.

सध्या माण-खटाव मतदारसंघात जयकुमार गोरे यांना जोरदार विरोध होत आहे. जयकुमार गोरे हे विद्यमान आमदार असून ते काँग्रेसच्या तिकिटावर मागील निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. परंतु, या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गोरेंच्या भाजप प्रवेशानंतर स्थानिक भाजपमध्ये असंतोष पसरला. त्यांनी गोरेंच्या विरोधात सर्व पक्षीय आघाडी तयार केली. जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश करुन मतदारसंघावर शिवसेनेचा दावा केला.

दोन दिवसांपूर्वी भाजपची यादी आली, त्यात हा मतदारसंघ भाजपला म्हणजेच जयकुमार गोरेंना सोडल्याचं समोर आलं. पण, शेखर गोरेंनी या गोष्टीला कडाडून विरोध केला, पक्ष प्रमुखांवर माझा विश्वास आहे, हा मतदार संघ शिवसेनेचाच राहील, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर आज (4 ऑक्टोबर) शेखर गोरेंनी अधिकृत शिवसेनेच्या चिन्हावर मोठ्या शक्तीप्रदर्शनासह अर्ज भरला. त्यामुळे आता माण मतदारसंघात युतीची मैत्रीपूर्ण लढत होणार असल्यामुळे या लढतीत शेखर गोरेंनी जोरदार तयारी केली आहे.

माण तालुक्यात केलेल्या विकास कामांची पोहचपावती जनता मला देईल, असा विश्वास जयकुमार गोरेंनी व्यक्त केला.
माण-खटाव मतदारसंघात दोन सख्ख्या भावांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने युतीत मिठाचा खडा पडला आहे. भाजपकडून जयकुमार गोरेंचा दावा, तर शिवसेनेचा मतदार संघ असल्याचा शेखर गोरेंचा दावा असल्याने महाराष्ट्रातील या एकमेव मतदारसंघात ही मैत्रीपूर्ण लढत रंगतदार होणार आहे.

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *