जयकुमार गोरे-शेखर गोरे पुन्हा आमनेसामने, एकमेकांविरोधात गुन्हे 

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांचे बंधू शेखर गोरे यांच्याविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (jaykumar gore and shekhar gore crime registered)  आहे.

  • संतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा
  • Published On - 8:11 AM, 28 Jan 2020
जयकुमार गोरे-शेखर गोरे पुन्हा आमनेसामने, एकमेकांविरोधात गुन्हे 

सातारा : भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांचे बंधू शेखर गोरे यांच्याविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (jaykumar gore and shekhar gore crime registered)  आहे. एका महिलेस शिवीगाळ करुन तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कुळकजाई विकास सेवा सोसायटीच्या ठराव प्रक्रियेदरम्यान 3 संचालकांना जबरदस्तीने गाडीत नेल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेस शिवीगाळ करुन तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेचा पती हा शेखर गोरे यांचा कार्यकर्ता आहे.

माण तालुक्यातील कुळकजाई विकास सेवा सोसायटीवर आमदार जयकुमार गोरेंचे वर्चस्व आहे.

दरम्यान शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यानी जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल केला आहे. तर जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्यानी शेखर गोरेंवर गुन्हा दाखल केला (jaykumar gore and shekhar gore crime registered) आहे.