पेटवून घेऊन जळत्या अंगाने थेट पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात धाव, पुण्यातील थरार

पोलीस आयुक्तालयाच्या दारात पेटवून घेत जळत्या व्यक्तीने थेट कार्यालयात धाव घेतली. पेटत्या अंगाने हा व्यक्ती पोलीस आयुक्तालयात घुसल्याने एकच खळबळ उडाली.

पेटवून घेऊन जळत्या अंगाने थेट पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात धाव, पुण्यातील थरार
गेल्या 11 महिन्यांत पुण्यातल्या कुख्यात टोळ्यांना आवर घालण्यासाठी तब्बल 50 टोळ्यांविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

पुणे : पोलीस आयुक्तालयाच्या दारात पेटवून घेत जळत्या व्यक्तीने थेट कार्यालयात धाव घेतली. पेटत्या अंगाने हा व्यक्ती पोलीस आयुक्तालयात घुसल्याने एकच खळबळ उडाली. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राच्या कारणातून संबंधित व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Pune)

पेटवून घेतल्याने भाजलेल्या या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चारित्र्य पडताळणीच्या कारणातून संबंधित व्यक्तीने स्वतःला पेटवून घेत, थेट कार्यालयात धाव घेतली. नागरीसुविधा केंद्राजवळ संबंधित व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले. त्यानंतर थेट आयुक्तालयात धावत सुटला. यावेळी प्रसंगावधान राखत तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींनी आग विझवली.

पेटवून घेणारी व्यक्ती कोण, कुठे राहणारी आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

नेमकं काय घडलं? 

एक व्यक्ती पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आली होती. चारित्र पडताळणी प्रमाणपत्रासाठी हा व्यक्ती आल्याचं सांगण्यात येत आहे. आजही ही व्यक्ती पोलीस आयुक्तालयाबाहेर आली होती. त्यावेळी दुपारच्या सुमारास या व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं. स्वत:वर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतलं. इतकंच नाही तर त्या पेटत्या अंगाने या व्यक्तीने थेट पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेतली. हा सर्व थरार उपस्थित लोक पाहात होते. त्याचवेळी काहींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

पेटत्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचं धाडस काहींना करता आलं नाही. पण काहींनी ते धाडस करुन, आग विझवली. त्यानंतर त्या व्यक्तीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या सर्व थरारानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या  

आधी इन्स्टाग्रामवर ओळख, मग शारीरिक संबंध; हनी ट्रॅप करून व्यावसायिकाला लुटणारी टोळी पुण्यात जेरबंद

पुणे विद्यापीठाचा देशात डंका! संरक्षण विभागात स्थापन होणार ‘चेअर ऑफ एक्सलन्स’

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI