आधी इन्स्टाग्रामवर ओळख, मग शारीरिक संबंध; हनी ट्रॅप करून व्यावसायिकाला लुटणारी टोळी पुण्यात जेरबंद

गेल्या आठवड्यात इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून हनी ट्रॅप (Honey Trap) करत कोंढव्यात पनवेलच्या (Panvel) व्यावसायिकाला लुटल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी व्यावसायिकानं पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आता व्यावसायिकाला लुटणाऱ्या टोळीला सापळा रचत अटक केली आहे. यामध्ये एका तरूणीचाही समावेश आहे.

आधी इन्स्टाग्रामवर ओळख, मग शारीरिक संबंध; हनी ट्रॅप करून व्यावसायिकाला लुटणारी टोळी पुण्यात जेरबंद
Police-arrest

पुणे : गेल्या आठवड्यात इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून हनी ट्रॅप (Honey Trap) करत कोंढव्यात पनवेलच्या (Panvel) व्यावसायिकाला लुटल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी व्यावसायिकानं पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आता व्यावसायिकाला लुटणाऱ्या टोळीला सापळा रचत अटक केली आहे. यामध्ये एका तरूणीचाही समावेश आहे. तपासासाठी त्यांना २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Police have arrested a gang who robbed a businessman by trapping Honey on Instagram in Pune)

काय आहे प्रकरण?

न्यू पनवेल इथं राहणाऱ्या ३१ वर्षीय व्यावसायिकाची पुण्यातल्या एका महिलेसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या महिलेनं त्याला पुण्यात भेटायला बोलावलं. त्यानुसार हा तरूण ७ ऑगस्टला कोंढव्यातल्या येवलेवाडी इथं महिलेला भेटायला आला. यावेळी या महिलेनं तरूणाला जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर व्यावसायिक आपल्या कारने पनवेलकडे जात असताना त्याला रस्त्यात ३ जणांनी अडवून व्यावसायिकाला मारहाण केली. ”तू या महिलेवर बलात्कार केला आहे. आम्ही तुझ्याविरोधात पोलिसांत तक्रार देणार आहोत” असं म्हणत तरूणाला धमकावलं. व्यावसायिकाकडे आरोपींनी ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली.

पैसै दिले नाही तर पोलिसांत तुझ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. पैसे दिले नाही तर महिलेसोबत लग्न करावं लागेल, असं कागदावर लिहून घेतलं. त्यावर तरूणाचा सही आणि अंगठा घेतला. घाबरलेल्या तरूणाने आरोपींना त्याच्याजवळ असलेले रोख ५० हजार रुपये दिले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर एटीएम कार्डमधून जबरदस्तीने ३० हजार रुपये काढून घेतले.

टोळीने अनेकांना लुबाडल्याचा संशय

पोलिसांनी अटक केल्यानंतर टोळीची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये या टोळीने अनेकांना लुबाडलं असल्याचं अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, बदनामीपायी कुणी तक्रार देण्यासाठी समोर आलेलं नाही. पनवेलच्या या व्यावसायिकानं तक्रार देण्याचं धाडक केलं आणि टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

टोळीमधला एक रेकॉर्डवरचा गुन्हेगार

पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये एक जण रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधीही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तांत्रित विश्लेषणाच्या आधारावर पोलिसांनी या आरोपींचा माग काढला. बोपदेव घाटातल्या एका हॉटेलमधून पोलिसांनी या टोळीला जेरबंद केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. येवलेवाडी भागातल्या एका फ्लॅटमधून ही टोळी आपले काळे कारनामे करत होती असं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे.

संबंधित बातम्या :

इन्स्टाग्रामवरची मैत्री पडली महागात, आधी महिलेने जबरदस्तीने ठेवले शारीरिक संबंध, नंतर….

शेताजवळ खेळणाऱ्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तरुणाकडून अत्याचार, बीडच्या घटनेने महाराष्ट्र हादरला

चारित्र्याच्या संशयातून कोयत्याने वार, पत्नीच्या हत्येप्रकरणी पिंपरीत तरुणाला बेड्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI