शेताजवळ खेळणाऱ्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तरुणाकडून अत्याचार, बीडच्या घटनेने महाराष्ट्र हादरला

बीडमध्ये पुन्हा एक संतापजनक घटना समोर आली आहे. बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काल (मंगळवार) घडली आहे. कालच्या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे.

शेताजवळ खेळणाऱ्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तरुणाकडून अत्याचार, बीडच्या घटनेने महाराष्ट्र हादरला
नेकनूर पोलिस ठाणे

बीड : बीडमध्ये पुन्हा एक संतापजनक घटना समोर आली आहे. बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काल (मंगळवार) घडली आहे. कालच्या घटनेने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला आहे.

नेकनूर जवळ असलेल्या छोट्याशा गावातील 11 वर्षीय पीडिता, आई-वडील बाहेरगावी गेल्यानंतर ती आपल्या मक्याच्या शेताजवळ खेळत होती. या दरम्यान त्या ठिकाणाहून जाणाऱ्या, 24 वर्षीय नराधमाने तिला उतलत नेऊन मक्याच्या शेतात अत्याचार केलाय. तर हा प्रकार लक्षात येताच शेजारच्या शेतात असणार्‍या दोन व्यक्तींनी तात्काळ पळत जात त्या तरुणाला पकडलं आणि पीडितेच्या आई-वडिलांना कळवलं.

दरम्यान याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नेकनुर पोलिस ठाण्यामध्ये, रात्री उशिरा नराधम 24 वर्षीय आरोपीवर बाललैंगिक अत्याचार, पोक्सोसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.

(11-year-old girl tortured in Beed neknoor)

हे ही वाचा :

मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरण, फरार आरोपी देवानंद रोचकरी अखेर मंत्रालयाजवळ सापडला

व्हिडीओ गेम पार्लरच्या नावाखाली आकडे लावून जुगार, पुण्यात पाच जणांना अटक

चारित्र्याच्या संशयातून कोयत्याने वार, पत्नीच्या हत्येप्रकरणी पिंपरीत तरुणाला बेड्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI