व्हिडीओ गेम पार्लरच्या नावाखाली आकडे लावून जुगार, पुण्यात पाच जणांना अटक

देहूरोड येथील भाजी मार्केटशेजारी जय मातादी व्हिडीओ गेम पार्लर आणि जय गणेश व्हिडीओ गेम पार्लर आहेत. या ठिकाणी व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती

व्हिडीओ गेम पार्लरच्या नावाखाली आकडे लावून जुगार, पुण्यात पाच जणांना अटक

पिंपरी चिंचवड : व्हिडीओ गेम पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. यावेळी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. देहूरोड भाजी मार्केट परिसरात ही कारवाई करण्यात आली

व्हिडीओ गेम चालक मालक सौदागर शिवाजी शिंदे, सचिन त्र्यंबक म्हस्के, जुगार खेळी गोवर्धन सर्जेराव आडागळे, विजय रामपाल दिल्लोड, जावेद शाहबुद्दीन शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह व्हिडीओ गेम मालक संदीप टंडन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

देहूरोड येथील भाजी मार्केटशेजारी जय मातादी व्हिडीओ गेम पार्लर आणि जय गणेश व्हिडीओ गेम पार्लर आहेत. या ठिकाणी व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी दोन्ही दुकानांवर छापा मारला.

आकड्यांवर पैसे लावून हारजीत जुगार

त्यावेळी आरोपी दुकानातील इलेक्ट्रॉनिक व्हिडीओ गेम मशीनवरील आकड्यांवर पैसे लावून हारजीत जुगार खेळत होते. पोलिसांनी या कारवाईमध्ये एक लाख 25 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पिंपरीतील बार-लॉजवर छापेमारी

दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गेल्याच शनिवारी रात्री बार आणि लॉजवर छापेमारी केली होती. जगताप डेअरी परिसरातील अॅलो गॅस्ट्रो लॉज आणि एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारवर पोलिसांनी धाड टाकली होती. यावेळी 200 हून अधिक तरुण-तरुणींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

कोल्हापुरात जुगार अड्ड्यावर छापा

दुसरीकडे, इचलकरंजी शहरातील तीन पानी जुगार खेळणार्‍या 7 जणांवर डीवायएसपी पथकाने नुकतीच कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान दोघे जण पसार झाले होते. येथील माई हायस्कूल जवळील हजारे कारखान्याच्या मोकळ्या शेडमध्ये ही पोलीस कारवाई करण्यात आली होती. सुमारे 51 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यामध्ये 3 मोबाईल हँण्डसेट, एक मोटारसायकल आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले होते. याबाबत शिवाजीनगर पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

पिंपरीत लॉज आणि बारवर पोलिसांचे छापे, 200 हून अधिक तरुण-तरुणी ताब्यात

विवाहित प्रियकराचा लग्नास नकार, चिंचवडमध्ये प्रेयसीने लॉजवर बोलावून गळा आवळला

इचलकरंजीत मोकळ्या शेडमध्ये 3 पानी जुगाराचा अड्डा, 7 जण पोलिसांच्या ताब्यात

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI