Satara : पोलिसांच्या विशेष पथकानं केली प्रतापगडाजवळच्या अफझलखानाच्या कबरीची पाहणी; राज ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य

| Updated on: May 25, 2022 | 9:51 AM

अकबरुद्दीन ओवैसींनी औरंगजेबाच्या कबरीवर डोके ठेवले होते. त्यानंतर सर्वच पक्षांनी त्यावर टीका केली. राज ठाकरे यांनीही टीका करत औरंगाबादेतील औरंगजेबाची कबर तसेच साताऱ्यातील अफझलखानाच्या कबरीबाबत वक्तव्य केले होते, त्यानंतर आता पोलिसांनी याठिकाणी पाहणी केली आहे.

Satara : पोलिसांच्या विशेष पथकानं केली प्रतापगडाजवळच्या अफझलखानाच्या कबरीची पाहणी; राज ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य
प्रतापगडाजवळच्या अफझलखानाच्या कबरीची पाहणी करताना पोलीस पथक
Image Credit source: tv9
Follow us on

सातारा : प्रतापगडावरील अफझलखान कबरीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पोलीस दल सतर्क झाले आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने कबरीसह प्रतापगडाची (Pratapgad Fort) पाहणी केली आहे. विशेष पथकाने पाहणी केल्याचे फोटो सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत यावर वक्तव्य केले होते. प्रतापगडाजवळ अफझलखानाच्या कबरीचा विस्तार होऊन मशिद झाली, त्यावर राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली होती. तर अकबरुद्दीन ओवैसींची (Akbaruddin Owaisi) औरंगाबादेत सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर डोके ठेवले होते. त्यानंतर सर्वच पक्षांनी त्यावर टीका केली. राज ठाकरे यांनीही टीका करत औरंगाबादेतील औरंगजेबाची कबर तसेच साताऱ्यातील अफझलखानाच्या कबरीबाबत वक्तव्य केले होते, त्यानंतर आता पोलिसांनी याठिकाणी पाहणी केली आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

पुण्यातील सभेत राज ठाकरे म्हणाले होते, की प्रतापगडाजवळच्या अफझलखानाच्या कबरीचा विस्तार झाला. तिथे मशिद झाली आहे. त्याच्या मशिदीसाठी फंडिंग येत आहे. शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्याच्या मशिदीसाठी फंडिंग येते. कोण आहेत या औलादी? कुठून येतात पैसे? आम्ही शांत आहोत. लोण्याच्या गोळ्यासारखे. आम्हाला काही पडले नाही. अफजल खान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे. तो त्याच्या राज्याचा विस्तार करायला आला होता. मग काय मध्ये शिवाजी महाराज आले काय, असा सवाल त्यांनी केला होता.

प्रतापगड परिसराची पोलिसांकडून पाहणी

हे सुद्धा वाचा

औरंगजेबाच्या कबरीवरूनही केली होती टीका

औरंगाबादेत शिवसेनेचा खासदार पडला. एमआयएमचा निवडून आला. निजामाच्या औलादी इकडे वळवळ करायला लागल्या. यांना भुसभूशीत जमीन दिली कुणी? आमच्याच देशात आमच्याच महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते. आग्र्याहून निघालेल्या औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकते. आम्हाला लाज नाही, शरम नाही. शरद पवार यांना औरंगजेब सुफी संतच वाटत असेल तर काय बोलायचे? ओवैसी महाराष्ट्रात कबरीवर डोके ठेवतो. महाराष्ट्र खवळेल असे वाटत होते. पण महाराष्ट्र थंड आहे, असे टीकास्त्र त्यांनी पुण्यातील सभेत सोडले होते.