Shambhuraj Desai : संजय राऊतांचा पोपट…; शंभूराज देसाईंनी थेट निशाणा साधला, नेमकं काय म्हणाले?
संजय राऊतांना मंत्री शंभूराज देसाईंनी जोरदार उत्तर दिलं आहे. सरकार शेतकऱ्यांना करत असलेल्या मदतीवरुन राऊतांनी प्रश्न उपस्थित केला होता, सरकार कोसळणार असा दावाही राऊतांनी केला होता. त्यानंतर देसाईंनी जोरदार टोला लगावला आहे.

संजय राऊत यांचा पोपट नेहमी चुकीची चिट्ठी काढतो, असं म्हणत मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. हे सरकार कोसळणार असल्याचा दावा संजय राऊत वारंवार करतात. त्यांच्या या दाव्यांवर देसाई यांनी निशाणा साधला. ते सांगलीत बोलत होते. संजय राऊत यांच्यावर टीका करताना शंभूराज देसाई म्हणाले, यात्रेत पोपट घेऊन बसतात आणि त्याच्याकडून चिट्ठी काढली जाते. तसा संजय राऊत यांचा पोपट नेहमी चुकीची चिट्ठी काढत असतो. सरकार कोसळणार असल्याचे त्यांचे दावे सातत्याने सुरू असतात, असं देसाई म्हणाले. ‘अग्रीम’चा अर्थ समजून घ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीवरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “ही अग्रीम मदत आहे. अग्रीमचा अर्थ संजय राऊत यांनी समजून घ्यावा. संजय राऊत स्वच्छ आणि खूप चांगलं मराठी बोलतात. जसं ते अर्वाच्य बोलू शकतात, तसं ते चांगलं मराठीही बोलतात, हे मी ऐकलं आहे. त्यामुळे अग्रीमचा अर्थ समजून घ्या. अग्रीम...