अभिजीत दिपके यांना भेटून बच्चू कडू म्हणाले की, मी आता नेता म्हणून आलेलो नाही…तर…

जे जे वाईट होत असतं, त्या संदर्भात आंदोलन करणं गुन्हा नाही. मी देखील आंदोलनातूनच आलेलो आहे. एखादी गोष्ट नाही पटली. तर सत्तेत राहून आंदोलन करावंच लागतं असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

अभिजीत दिपके यांना भेटून बच्चू कडू म्हणाले की, मी आता नेता म्हणून आलेलो नाही...तर...
MLA Bachchu Kadu visited Abhijit Dipke at his home.
| Updated on: Jul 30, 2026 | 6:44 PM

अभिजीत दिपके यांच्या घरी जाऊन आज शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी त्यांची भेट घेतली. मी काय पाकिस्तानातून आलोय का ? सरकारी पक्षातून कोणी भेटायला येऊ शकत नाही का ? दिपके हे आंदोलक तर मी देखील एक आंदोलकच आहे, दिपके शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन करणार असतील तर सरकारला आरसा दाखवणे हे चूक नाही. प्रसारमाध्यमांनी आंदोलकांना गुन्हेगार ठरवले आहे अशा शब्दात आमदार बच्च कडू यांनी अभिजीत दिपके यांना भेट दिल्यानंतर म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की लढणाऱ्या लोकांसोबत उभे राहणं गरजेचं आहे.अभिजीत दिपके यांचा अभिनंदन करण्यासाठी मी आलो होतो. त्यांचा अभिनंदन केलं पाहिजे. सरकार, पक्ष, पार्टी हा विषय वेगळा आहे.मी येथे आता नेता म्हणून नाही तर एक आंदोलक म्हणून त्यांना भेटलेलो आहे, तुम्ही अशी गफलत करू नका. मी नेता नाहीच, माझं नाव बच्चू कडू, माझ्या नावातच कार्यकर्ता आहे असेही बच्चू प्रसारमाध्यमांवर आरोप करत म्हणाले.

भाजपाकडून दिपके यांना धमक्या येत आहेत अशी तक्रार त्यांनी केली आहे यावर उत्तर देताना आमदार बच्चू कडू म्हणाले की आता अशा प्रकारच्या धमक्या देण्याचा काळ राहिलेला नाही. जर कुणी धमक्या देत असल, कोणी चुकीचा वागत असेल, तर भाजपचे जे प्रमुख लोक धमक्या देतात त्यांना मी सांगेल असेही ते यावेळी म्हणाले.

राजकारणात असा काही विटाळ नसतो. सत्ताधाऱ्यांनी येऊ नये, जाऊ नये अशी आचारसंहिता थोडी आहे आणि असली तरी बच्चू कडू ती तोडणार आहे.आम्ही आंदोलक म्हणून भेटायला आलेलो आहे. प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक गोष्टीवर विचार वेगळे असू शकतात. तुम्ही म्हणता भूमिका वेगळी आहे, मात्र केंद्रात 24 पक्षांची सत्ता आहे. सर्वांचे विचार सारखे आहेत का? वैचारिक लढाई वेगळी आणि सत्ता वेगळी असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

बच्चू यांचा सरकारला आहेर

ज्या मध्यवर्ती बँक आहेत, त्याला कट लावला आहे. ज्या कमजोर बँक आहेत त्यांना पूर्ण पैसे दिले आहेत. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मुद्दल सरकार भरणार आणि व्याज राष्ट्रीयकृत बँका माफ करणार आहेत. यादीमध्ये केवळ मुद्दल दिसत आहे. बँक व्याज माफ करणार आहे,त्यामुळे व्याजाची रक्कम दिसत नाही. कर्ज पूर्णच माफ होणार आहे. व्याजही भरावे लागणार नाही, कुठला बँक आणि मॅनेजर जर तसं वागत असेल त्याच्या कानफडीत वाजायला मी आहे असा आहेर यावेळी बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.

आरसा दाखवणे म्हणजे काय चूक आहे का ?

दिपके होणार शेतकरी आंदोलनात सहभागी होत असतील तर आंदोलन करणे ही काही चूक नाही, आरसा दाखवणे म्हणजे काय चूक आहे का? आंदोलन म्हणजे गुन्हेगार असे समीकरण करून टाकले मीडिया वाल्यांनी. आता यंत्रणा मजबूत झाली पाहिजे. नीट परीक्षा सत्व आणि तत्व वापरून झाल्या पाहिजे. मी सत्ता पक्षाचा असल्यामुळे काय झालं ? मी काय पाकिस्तानातून थोडी आलोय असा टोला या भेटीवर बच्चू कडू यांनी लगावला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us