पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमातच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, शिवसैनिकांची तुफान गर्दी

डोंबिवलीत शासकीय रुग्णालयात महापालिकेच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला (Shiv Sena party workers crowd in Dombivali program).

पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमातच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, शिवसैनिकांची तुफान गर्दी

ठाणे : डोंबिवलीत शासकीय रुग्णालयात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आरोग्य सेवेचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी पाहून एकनाथ शिंदेही दचकले. या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला (Shiv Sena party workers crowd in Dombivali program).

कार्यक्रमात शिवसैनिकांची गर्दी पाहून एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं. कोरोनापासून बचावासाठी आपण मास्क लावणे, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणे गरजेचे आहे. मात्र या ठिकाणी अंतर दिसत नाही, असं शिंदे कार्यकर्त्यांना म्हणाले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा सल्ला दिला.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्याकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनी मास्क लावणे आणि सामाजिक अंतर ठेवणे हे गरजेचे आहे. याबाबत प्रशासनाकडून वारंवार आवाहन केलं जात आहे.

मास्क न लावणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली जात आहे. मात्र डोंबिवलीत शासकीय रुग्णालयात महापालिकेच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला (Shiv Sena party workers crowd in Dombivali program).

दरम्यान, नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी, महापौर विनिता राणे,भाजप आमदार रवींद्र चव्हाण, महापालिका अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण कार्यक्रम पार पडला.

हेही वाचा : दसरा मेळाव्यातील गर्दी महागात, पंकजा मुंडेंसह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *